शहराला दर महिन्याला विष्णुपुरीतून अडीच दलघमी पाणी दिले जाते. त्यावर शहरवासीयांची तहान भागते. विष्णुपुरी प्रकल्प सध्या शंभर टक्के भरला आहे; परंतु त्यानंतरही नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक भागात निर्जळी आहे.
काय होतात आजार
दूषित पाण्यासाठी गॅस्ट्रो, टायफाॅइड, काविळ, कॉलरा यासारखे व इतरही आजार होतात. रुग्णांत लहान मुलांचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर सर्दी, ताप, मळमळ करणे यासारखा त्रास होतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी पिताना काळजी घेण्याची गरज आहे.
काय घ्यावी काळजी
पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो पाणी उकळून प्यावे. लहान मुलांची या काळात विशेष काळजी घ्यावी. दूषित पाण्यामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे लवकर साथीचे रोगाची लागण होते. तसेच थंड पदार्थ, पेय टाळावे. त्याऐवजी शरीराला गरम ठेवणारे पदार्थ खावेत, अशी माहिती फिटनेस तज्ज्ञ डॉ. अनिल पाटील यांनी दिली.