लोकमत न्यूज नेटवर्कलोहा : मागील काही दिवसांपासून जुना लोहा भागातील नालीतील सांडपाण्याचे योग्य नियोजन करावे, या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी नगरपालिकेच्या कार्यालयात घुसून मुख्याधिकारी यांच्या दालनासह सर्व विभागांत नालीतील घाण पाणी टाकून रोष व्यक्त केला.जुना लोह्यातील भोईगल्ली परिसरात गत अनेक दिवसांपासून नालीचे सांडपाणी तुंबत असून त्याचे नियोजन करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली होती़ मात्र अद्यापपर्यंत त्याचे नियोजन न केल्याने संतप्त नागरिकांनी नालीतील बेंदाडयुक्त घाण पाणी न. प. कार्यालयातील मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासह सर्वच विभागात टाकून रोष व्यक्त केला. मुख्याधिका-यांच्या खुर्चीवरही पाणी टाकण्यात आले़ हा प्रकार १२ आॅक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडला. सदर प्रकारामुळे कर्मचा-यांत गोंधळ उडाला़ कर्मचाºयांनी नंतर सर्व प्रकार वरिष्ठांच्या कानावर घातला़ तेव्हा मुख्याधिका-यांनी कर्मचा-यांवर दबाव टाकत निवेदनाआधारे पोलिसांत अर्ज करण्यास सक्ती केल्याचे सांगण्यात आले़१७ कर्मचाºयांनी स्वाक्षरीनिशी पोलिसांत निवेदन दिले़ मात्र न.प. प्रमुखांनी तक्रार दिल्याशिवाय गुन्हा नोंद करता येत नसल्याचे पोलिसांनी कळविले. मुख्याधिकारी व कार्यालयीन अधीक्षकांनी रितसर तक्रार दिली नसल्यामुळे गुन्हा नोंदविण्यात आला नाही. नगरपरिषदेतील कर्मचा-यांना अग्निशमन वाहनाच्या मदतीने तब्बल तासभराच्या अथक परिश्रमानंतर पालिका स्वच्छ करावी लागली. यासंदर्भात मुख्याधिका-यांसह कार्यालयीन अधीक्षकांनी फोन घेण्यास टाळले. सर्व साफसफाई करत ेवेळी नगरपालिकेत पाणीच पाणी झाले होते.
आरोपीविरुद्ध नियमानुसार गुन्हा दाखल करूमी स्वत:हून मुख्याधिकारी अशोक मोकले व कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड यांना भ्रमणध्वनीवरून आपण तक्रार दिल्याशिवाय कार्यवाही करता येणार नसल्याचे कळविले, मात्र रात्री उशिरापर्यंत त्यांची तक्रार प्राप्त झाली नसल्यामुळे आरोपीविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला नाही. रितसर तक्रार आल्यास गुन्हा नोंदविला जाईल. - बालाजीराव मोहिते पाटील (पोलीस निरीक्षक)