नांदेड : लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राहिली नाही़ त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी करू. राष्ट्रवादीला राज्यातील अन्य कुठलाही मतदारसंघ सोडावा़ यासाठी प्रयत्न करू तसेच लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचा खासदार निवडून यावा यासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन आ.अमरनाथ राजूरकर यांनी लोहा येथे पक्षाच्या जनसंपर्क अभियान कार्यक्रमात केले.लोहा येथे काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क अभियान बूथ कमिटी शक्ती केंद्र मेळाव्याचे आयोजन केले होते़ अध्यक्षस्थानी आ़अमरनाथ राजूरकर हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ़रोहिदास चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, प्रभारी डॉ़ श्याम तेलंग, उपाध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, संजय बेळगे, प्रवक्ते संतोष पांडागळे, आनंदा गुंडले, रोहिदास जाधव, गंगाधर सोंडारे, माधराव पांडागळे, रंगनाथ भुजबळ, वसंतराव पवार, पंचशील कांबळे, युवराज वाघमारे, मोतीराम चुडावकर उपस्थित होते़लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राहिली नाही, त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे घ्यावा यासाठी खासदार अशोकराव चव्हाण यांच्याकडे मागणी करू. काँग्रेसचे तिकीट कोणालाही मिळो येथील भुताला पराभूत करू, असेही ते म्हणाले़
लोहा-कंधार मतदारसंघ काँग्रेसकडे घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 12:22 AM
नांदेड : लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघात आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद राहिली नाही़ त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्यावा यासाठी ...
ठळक मुद्देअमर राजूरकर : मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद राहिली नाही