शासन पातळीवरून बिनविरोध निवडणुकीसाठी गावांना विकास निधी उपलब्ध करून दिला जात असला तरी बुधवारपासून आवेदनपत्र भरणे सुरू झाले तरी कुठलाच गावात बिनविरोध निवडणुकीसाठी ग्रामस्थ पुढाकार घेताना दिसत नाहीत. यावर्षी निवडणुकीत अनेक गावात तरुण युवक निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याने गावागावांत निवडणुकीची चुरस वाढताना दिसत आहे. यामुळे गावातील ज्येष्ठ राजकारण्यांनी बिनविरोध निवडणुकीचा विषय मानला तरी तरुणांकडून तो उधळून लावला जात असल्याचेही चित्र काही गावांत दिसू लागले आहे. त्यामुळे आता बिनविरोध निवडणुकीचा विषय बाजूला ठेवून तू तिकडून, तर मी इकडून म्हणत अनेक जण एकमेकांसमोर आव्हान उभे करीत असल्याने ग्रामपंचायतीचा आखाडा चांगलाच गाजणार असल्याचे बोलले जात आहे.
तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षप्रमुखांनी आपल्या गावातील ग्रामपंचायत बिनविरोध काढण्यासाठी प्रयत्न केले, तर त्यांचा पायंडा इतरही गावांतील पुढारी घेतील. लोकप्रतिनिधींनीही ग्रामपंचायत बिनविरोध काढावी असे आवाहन केले आहे व बक्षीस ठेवले आहे; परंतु प्रत्यक्षात यात किती यश मिळेल याकडेही बघण्यासारखे आहे.
कोट
अद्याप आवेदनपत्र भरणे सुरू झाले तरी अजून आवेदनपत्र मागे घेण्यासाठी सात दिवसांचा अवकाश आहे. जर गावागावांत बैठका घेऊन बिनविरोधसाठी पुढाकार घेतला, तर काही गावे तरी बिनविरोध निघतील, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
-गोविंद अंतापुरे, ग्रामस्थ बारूळ
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी
देगलूर : भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी नुकतीच खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चा शहराध्यक्ष अशोक कांबळे यांनी जाहीर केली.
भाजयुमो शहर उपाध्यक्ष- संतोष मरतुळे, सचिन कांबळे, अमरनाथ पब्वावार, सौरभ मधुरवार, चिटणीस- योगेश राऊलवर.
दरम्यान, प्रदीप नामावार, योगेश गज्जावर यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला. प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपचे सरचिटणीस गंगाधर जोशी, श्रावण भिलवडे, शिवराज पाटील होटाळकर, लक्ष्मण ठक्करवाड, माधव उच्चकर, रवी पाटील खतगावकर, मारुती वाडेकर, किशोर देशमुख आदींची उपस्थिती होती.