जिल्हा पातळीवर बालविवाह प्रकरणात हस्तक्षेप करणे आणि अशा असुरक्षित कुटुंबांना आणि मुलांना आधार देणे याबाबत सुपरवायझर ( एलएचव्ही) आणि राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचे कंत्राटी जिल्हा समन्वयक, एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्यवेक्षक, विस्तार अधिकारी यांच्यामार्फत कर्मचारी वर्गात जागरूकता वाढविण्याच्या हेतूने ८ व ९ रोजी शिवाजीनगर येथे दीड दिवसाचे प्रशिक्षकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील शिंगणे, बालकल्याण समितीचे अध्यक्ष डॉ. प्रा. निरंजन कौर, एसबीसी संस्थापक निशीत कुमार आदींची प्रमुख उपस्थिती होती. महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल ॲण्ड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन (एसबीसी-३) जिल्हा प्रशासनासोबत जिल्ह्यातील बालविवाह निर्मूलनासाठी एकत्रितपणे काम करीत आहेत.
सदर कार्यक्रमासाठी जिल्हा बालसंरक्षण अधिकारी विद्या आळणे आणि पूजा यादव, राज्य अधिकारी, बालविवाह निर्मूलन प्रकल्प एसबीसी आदींनी परिश्रम घेतले.
सदर कार्यक्रमात ८०हून अधिक प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. शासनाच्या विविध योजना मुलींपर्यंत पोहोचून सक्षम बनविण्यासाठी प्रत्येक योजनेची माहिती गावागावापर्यंत देऊन मुलींच्या सक्षमीकरणासाठी एकत्रित प्रयत्न करण्याबाबत प्रशिक्षकांना माहिती देण्यात आली.