चौकट--------------
सध्याच्या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी लस घेणे आवश्यक आहे. या लसीमुळे कसलाही अपाय होत नाही. त्यामुळे मासिक पाळी सुरू असतानाही महिलांना लस घेता येईल. गर्भवती असणाऱ्या महिलांनी मात्र ही लस टाळायला हवी. कोरोनासाठीच्या या लसीत निष्क्रिय जिवंत विषाणू असल्यामुळे ही लस गर्भवती महिलांना देता येत नाही. मात्र गर्भधारणा होण्यापूर्वी ही लस घेता येऊ शकते.
- डॉ. कुंटूरकर, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका, नांदेड
गाईडलाईन काय सांगतात
कोरोना उपचाराबरोबरच लसीकरणासंदर्भातही शासनाने अत्यंत सुस्पष्ट दिशा निर्देश दिलेले आहेत. मासिक पाळीमध्ये लस घेतली तरी कुठलाही अपाय होत नाही. त्यामुळे चुकीच्या माहितीवर विसंबून न राहता महिलांनी लस घ्यायला हवी. गरोदर अवस्थेत आणि बाळ सहा महिन्यांचे असेपर्यंत मात्र महिलांनी लस घेऊ नये, असे निर्देश राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेले आहेत.
नांदेड लसीकरणाचे लक्ष्य
११५९, ४१९ पहिला डोस २३३७९९
महाराष्ट्र - पहिला डोस- १३,०४,५०० दुसरा डोस- २२,९२,८३२