हा रस्ता रुंदीकरणाचे काम चालू असल्यामुळे अगोदर या रस्त्याच्या दुतर्फा नाल्यांचे खोदकाम होऊन डाव्या बाजूच्या नालीचे बांधकाम चालू असून दोन्ही नाल्यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रस्ता मजबुतीकरण होणार असल्याचे कळते. सध्या खोदकाम करून ठेवलेल्या दुतर्फा नाल्या सांडपाण्याने पूर्ण भरून रस्त्यावर पाणी येत आहे. पादचारी तसेच दुचाकीस्वारांच्या अंगावर हे सांडपाणी येत आहे. रहिवासी मोठ्या कसरतीने या रस्त्यावरून वावरत आहेत. पावसाळ्यामध्ये या रस्त्यावरून तरोडा नाक्यापासून ते पंचशील इमारतीपर्यंत अतिशय वेगाने प्रवाह होतो. अनेकदा या रस्त्याला नदीचे स्वरूप येते. रस्ता आणी नाली कोणती हे कळत नाही. तसेच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यामुळे कित्येक प्रवासी पाण्यात पडल्याचे पाहावयास मिळते.
याच रस्त्यावरील रामराव पवार चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूर्ण घाण कचरा येथे जमा होतो. त्यामुळे तासनतास हा रस्ता रहदारीसाठी बंद होतो. या रस्त्याच्या नाली बांधकामास नेमकी आता सुरुवात झाली असून पावसाळा तोंडावर आला आहे. कासवगतीने काम सुरू आहे. कमी मनुष्यबळ आणि मोजक्या साधनांच्या साहाय्याने हे काम चालु असल्यामुळे या कामास पुर्ण होण्यास किती महिने लागतील याचा नेम नाही. पावसाळ्यामध्ये हा रस्ता पुर्णपणे बंद होतो की काय अशी समस्या त्यांना भेडसावत आहे.
याच रस्त्यावरील रामराव पवार चौकामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून पूर्ण घाण कचरा येथे जमा होतो. त्यामुळे तासनतास हा रस्ता रहदारीसाठी बंद होतो. या रस्त्याच्या नाली बांधकामास नेमकी आता सुरुवात झाली असून पावसाळा तोंडावर आला आहे. कासवगतीने काम सुरू आहे. कमी मनुष्यबळ आणि मोजक्या साधनांच्या साहाय्याने हे काम चालू असल्यामुळे या कामास पूर्ण होण्यास किती महिने लागतील, याचा नेम नाही. पावसाळ्यामध्ये हा रस्ता पूर्णपणे बंद होतो की काय, अशी समस्या त्यांना भेडसावत आहे.