शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

कॉँग्रेससोडून भाजपत आलेल्या अंतापुरकरांनी देगलूरचा गड राखला; सलग दुसऱ्यांदा बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 19:52 IST

भाजपाच्या जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांना धोबीपछाड देत एकतर्फी विजय मिळविला

- शेख शब्बीरदेगलूर: विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याची अटकळे बांधली जात असतानाच भाजपाच्या जितेश अंतापुरकरांनी काँग्रेसच्या निवृत्ती कांबळे यांना धोबीपछाड देत एकतर्फी विजय मिळविला आहे. या विजयासह सलग दुसऱ्यांदा अंतापुरकरांनी  बाजी मारली आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या देगलूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापुरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर 2021 मध्ये पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणूकीत त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले जितेश अंतापुरकर यांनी दणदणीत विजय मिळविला होता. दरम्यान लोकसभा निवडणुकीपूर्वी अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केल्याने त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले जितेश अंतापुरकर यांनी ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचा हात सोडून भाजपचे कमळ हाती घेतले होते. त्यातच भाजपानेही त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. 

विशेष म्हणजे 2009 मध्ये राखीव झालेल्या या मतदारसंघात एकूण चार वेळा झालेल्या निवडणुकीत मुख्य लढत ही अंतापुरकर विरुद्ध साबणे यांच्यातच झाली होती. त्यातच पुन्हा एकदा तिसरी आघाडी कडून सुभाष साबणे व भाजपाकडून जितेश अंतापुरकर हे परंपरागत उमेदवार पुन्हा एकदा आमने- सामने आले होते. तर काँग्रेसने मात्र स्थानिक उमेदवाराच्या मागणी सह बौद्ध समाजाच्या उमेदवाराला संधी देत निवृत्ती कांबळे यांच्या रूपाने नवा चेहरा समोर आणला होता. त्यामुळे यंदा तिरंगी लढत होणार असा अंदाज होता. मात्र, काँग्रेसचे निवृत्ती कांबळे व भाजपाचे जितेश अंतापुरकर या दोघांमध्येच मुख्य लढत झाली. तर सुभाष साबणे हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. एकूण मतदानावरून सुरुवातीला अटीतटीची होणारी ही लढत अगदी एकतर्फी होऊन भाजपाचे जितेश अंतापुरकर यांनी दणदणीत विजय मिळविला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024deglur-acदेगलूरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक