लोकमत न्यूज नेटवर्कसगरोळी : येथून जवळच असलेल्या मौजे बोळेगाव येथे सध्या कावीळची साथ पसरली आहे. यामुळे ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. हा आजार दूषित पाण्यामुळेच होत असल्याची चर्चा होत आहे. या पंधरवड्यात गावातील दोन रूग्ण मृत्यू पावले असून बाधित रूग्ण आयुर्वेदिक उपचारासाठी शिवनखेडकडे जाताना दिसत आहेत.बिलोली तालुक्यात सगरोळीपासून दोन कि.मी.अंतरावर असलेल्या बोळेगावात दूषित पाण्याच्या प्राशनाने २० ते २५ हून अधिक लोकांना कावीळ या रोगाची लागण झाल्याने ग्रामस्थ कमालीचे वैतागले आहेत. मागील तीन महिन्यांत कावीळ बाधित रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून गत पंधरा दिवसांत केशव गंगाधर एकंमवार (वय २७), सायबू संतुका गोणेकर (वय ५२) हे दोघे नांदेड येथील खाजगी व शासकीय रूग्णालयात कावीळवर उपचारादरम्यान मृत्यू पावले आहेत. तर २० ते २५ हून अधिक कावीळबाधित रूग्ण उपचारासाठी शिवनखेडची वाट धरताना दिसत आहेत. ही साथ कावीळचीच असून दूषित व रासायनिक मिश्रीत गोडतेल खाण्याने व दूषित पाणी पिल्याने होत असल्याचे रूग्णांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. या दूषित पाणीपुरवठ्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत आहे. गत दोन ते तीन वर्षे उलटून गेले तरीही अजून एकदाही शुद्ध की अशुद्ध पाणी, याची नमुना चाचणी झाल्याचे दिसत नाही. याकडे आरोग्य विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
- मागील तीन महिन्यात कावीळ बाधित रूग्णांमध्ये वाढ होताना दिसत असून गत पंधरा दिवसात केशव गंगाधर एकंमवार (वय २७ वर्षे), सायबू संतूका गोणेकर (वय ५२ वर्षे) या दोघांचा नांदेड येथील खाजगी व शासकीय रूग्णालयात कावीळवर उपचारा दरम्यान मृत्यू पावले आहेत. तर २० ते २५ हून अधिक कावीळबाधित रूग्ण उपचारासाठी शिवनखेडची वाट धरताना दिसत आहेत.
पाण्याची तपासणी दोन वर्षांपासून नाहीया दूषित पाणीपुरवठ्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असून गत दोन ते तीन वर्षे उलटून गेले असले तरीही अजून एकदाही शुद्ध की अशुद्ध पाणी, याची नमुना तपासणी झाल्याचे दिसत नाही़ त्यामुळे या प्रश्नावर प्रशासन गांभीर्याने घेण्यास तयार नाही़ या भागातील लोकप्रतिनिधीही हा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येताना दिसत नाहीत़प्रशासनाने येथील शुद्ध पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे़२५ जणांना कावीळबिलोली तालुक्यातील सगरोळीपासून दोन कि़ मी़ अंतरावर असलेल्या बोळेगावात दूषित पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे़ कावीळच्या साथीने ग्रामस्थ वैतागले आहेत़