चार दिवस शाळा बंद
हदगाव - तामसा येथील जिल्हा परिषद हायस्कूलमधील शिक्षिका कोरोनाबाधित निष्पन्न झाल्यामुळे शाळा चार दिवस बंद ठेवण्यात आली. मंगळवारी शा.व्य.स.चे अध्यक्ष माजीद पठाण व सदस्यांनी शाळेत जाऊन याबाबतचा ठराव घेतला. या घटनेनंतर गटशिक्षणाधिकारी के.व्ही. फोले यांनी शाळेला तातडीने भेट दिली. शाळेतील सर्व शिक्षकांनी दोन दिवसांत कोरोना तपासणी करावी व शाळा सुरू होण्यापूर्वी वर्गखोल्यांना सॅनिटाइज करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
हळदीकुंकू कार्यक्रम
उमरी - येथील गिरीश देशमुख-गोरठेकर मंगल कार्यालयात हळदीकुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ताराबाई बोमनाळे होत्या. यावेळी शहराध्यक्ष अनिता अनंतवार, दीपाली मामीडवार, सुनीता श्रीरामवार, प्रणिता जोशी, प्रेमलता अग्रवाल, शारदा यम्मेवार, मंजूषा चाटोरीकर, शुभांगी पाळेकर आदी उपस्थित होत्या. जि.प. सदस्या पूनम पवार संयोजक होत्या.
रुई येथे ठिय्या आंदोलन
हदगाव - मराठा आरक्षणासाठी हदगाव तालुक्यातील रुई येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. शिवबा संघटनेचे लक्ष्मणराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार व संबंधितांना निवेदन देण्यात आले होते. पोलीस निरीक्षक हणमंत गायकवाड, उपनिरीक्षक मोरे यांनी आंदोलनाला भेट देऊन पाहणी केली.
रमेश गोवंदे यांना निरोप
नांदेड - एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ सहायक रमेश गोवंदे सेवानिवृत्त झाल्याने त्यांना एका कार्यक्रमात निरोप देण्यात आला. यावेळी अधिकारी एम.एस. वाघमारे, इतर कर्मचारी, नातेवाईक उपस्थित होते.
हरिनाम सप्ताहाची सांगता
कुंडलवाडी - बिलोली तालुक्यातील दौलापूर येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली. २ फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने महाप्रसाद झाला. यावेळी असंख्य भाविकांची उपस्थिती होती. मागील ९ वर्षांपासून हा कार्यक्रम चालू आहे.
मजविपचे निवेदन
नायगाव - मराठवाड्यातील विविध मागण्यांसाठी जनता विकास परिषदेच्या नायगाव शाखेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्यात यावी, नांदेड-बिदर रेल्वेमार्गाचे काम वेळेत व्हावे आदी मागण्यांचा यात समावेश आहे. निवेदनावर भाऊराव मोरे, निर्मला धुप्पेकर, मोहनराव पाटील, हणमंतराव खंडगावकर, बाबुराव अडकिणे, हणमंत जाधव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
चव्हाण रुजू
मनाठा - येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून विनोद चव्हाण यांनी १ फेब्रुवारी रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वीचे राजेंद्र मुंडे यांची नांदेड येथे बदली झाली. चव्हाण यांचे स्वागत व मुंडे यांना निरोपाचा कार्यक्रम यानिमित्ताने झाला. यावेळी सपोनि चिट्टेवार, जि.प. सदस्य के.सी. सूर्यवंशी, मारोतराव शिंदे, उत्तमराव शिंदे, शंकर सोनाळे, कोंडबा पाटील, किरण वानखेडे आदी उपस्थित होते.
जवळगावकरांचा सत्कार
हिमायतनगर - सरपंचपदाच्या आरक्षणानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आ. माधवराव पाटील-जवळगावकर यांची जवळगाव येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी सुभाष राठोड, शेख रफीक, गणेशराव शिंदे, परमेश्वर गोपतवाड, जनार्दन ताडेवाड, बाला पाटील, मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी, राजू पाटील, श्याम गड्डमवार, संतोष शिंदे, प्रभाकर कल्याणकर, दत्ता कोंकेवाड उपस्थित होते.
भाजपची बैठक
किनवट - बुथ संपर्क अभियानाच्या निमित्ताने भाजपची किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील बुथरचनेची बैठक आ. भीमराव केराम यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी प्रमुख पदाधिकारी लक्ष्मण ठक्करवाड, डॉ. माधव उच्चेकर, किशोर देशमुख, श्याम बापू भारती, सुधाकर भोयर, संध्या राठोड, धरमसिंग राठोड, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार आदी उपस्थित होते.