रुग्णालयाचे काम करू नये
कुंडलवाडी : येथील ग्रामीण रुग्णालय बांधकामासाठी एका देवस्थानाची निझामकालीन जमीन घेण्यात आलेली आहे. ही जमीन इनामी असल्याने त्या जागेवर रुग्णालयाचे बांधकाम करू नये व जमीन मोजमाप करून देवस्थानची जागा सोडून रुग्णालय बांधकाम करावे, अशा मागणीचे निवेदन देवस्थान समितीचे अध्यक्ष शेख वहाब सिराजोद्दीन यांनी तहसीलदारांना दिले. निवेदनात त्यांनी सर्व बाबी सविस्तर नमूद केल्या आहेत.
योग शिबिराचा समारोप
नांदेड : वामननगर येथील वरद गणेश मंदिराच्या प्रांगणात आयोजित योग शिबिराचा समारोप आ. बालाजी कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी योगसाधक किशन भवर, सोपानराव काळे, योगीता शिराढोणकर यांनी कठीण आसनांचे प्रदर्शन केले. याप्रसंगी नंदकुमार नारलावार यांचे व्याख्यान झाले. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक लोकेश निलेवार यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार किशन भवर यांनी केले. कार्यक्रमासाठी केदार चिद्रावार, अशोक गावकरी, ॲड. व्यंकटेश भवर, रंजना सोनटक्के, स्वाती नारलावार, कल्पना चिद्रावार यांचे सहकार्य मिळाले.
जिजाऊ व विवेकानंद जयंती
नांदेड : येथील जात पडताळणी कार्यालयात जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला अप्पर जिल्हाधिकारी पी. बी. खपले, संशोधन अधिकारी ए. बी. कुंभारगावे, एस. जे. रणवीरकर, व्ही. व्ही. आडे, ए. एम. झंपलवाड, साजीद हाश्मी, शिवाजी देशमुख, वैजनाथ मुंडे, संजय पाटील, सोनू दरेगावकर, मनोज वाघमारे, चिंचोलकर, विनोद पाचंगे, आर. पी. बंडेवार, जे. पी. जाधव, शंकर होनवडजकर, अमोल वाकडे, सुनील पतंगे, मोमीन शेख, अनिकेत वाघमारे उपस्थित होते.
जयंती कार्यक्रम उत्साहात
नांदेड : मालेगाव रोडवरील श्री दत्तप्रभू प्राथमिक व उच्च माध्यमिक प्रा. शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी झाली. कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, प्र. मु. अ. एस. डी. हिवराळे, सहशिक्षक पी. जी. नागरगोजे, ए. एस. गायकवाड, जी. एस. काळे, एम. एस. धर्माधिकारी, एस. एन. पापुलवार आदी उपस्थित होते.
घरगुती बियाणासाठी मार्गदर्शन
हदगाव : पुढील वर्षी खरीप हंगामात सोयाबीनची टंचाई भासण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात सोयाबीनची उन्हाळी पेरणी करावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांनी दिग्रस (ता. हदगाव) येथे केले. त्यांनी घरगुती बीज प्रक्रिया निर्मिती मोहिमेअंतर्गत दिग्रस, नाव्हा येथे भेटी देऊन सोयाबीनच्या घरगुती बियाण्यावर मार्गदर्शन केले. यावेळी कृषी सांख्यिकी अधिकारी अशेाक खरात, कृषी सहाय्यक राम मिरासे आदी उपस्थित होते.
विवाहितेचा छळ
मुक्रमाबाद : घर खर्चासाठी माहेराहून २ लाख रुपये आण, म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी मुक्रमाबाद पोलिसांनी सासरच्या मंडळींविरूद्ध गुन्हा नाेंदविला आहे. सुळगल्ली, लातूर येथे विवाहित राहात असे. तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
वातावरणाचा पिकावर परिणाम
बिलोली : गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामावरही मोठा परिणाम झाला. गव्हावर काही ठिकाणी खोड माशीचा प्रादुर्भाव झाला असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी होत आहे.
कार्यालयाचे उद्घाटन
मुखेड : श्रीराम मंदिर उभारणी समर्पण निधी कार्यालयाचे उद्घाटन सोमवारी डॉ. विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला आ. तुषार राठोड, नगराध्यक्ष बाबुराव देबडवार, गटनेते चंद्रकांत गरूडकर, नंदकुमार मडगुलवार, शिवकुमार महाजन, यज्ञेश्वर महाराज, माधव साठे, सत्यवान गरूडकर, डॉ. माधव उच्चेकर, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठित व्यापारी अशोक चौधरी यांनी केले. डॉ. अविनाश पाळेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महेश मुक्कावार, अशोक गजलवाड, किशोरसिंह चौव्हाण, भगवान गुंडावार, गिरीश देशपांडे, विनोद पोतदार, भगवान पोतदार, दशरथ रोडगे आदींनी परिश्रम घेतले.