शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कंधार तालुक्याच्या पाणंदमुक्तीचा गाडा रेती तुटवड्यात रुतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 5:41 PM

कंधार तालुक्यात निधीची वानवा दूर झाल्यानंतर आता पाणंदमुक्तीचा गाडा सुरळीत पार पडणार असे वाटत होते़ परंतु रेती तुटवड्यात पाणंदमुक्ती रुतली असल्याचे चित्र आहे़

ठळक मुद्देतालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत व सहाय्यक गटविकास अधिकारी कैैलास बळवंत यांनी विविध टप्पे केले़ आहेत त्यातून ११६ ग्रामपंचायती पाणंदमुक्त करण्यासाठी योग्य नियोजन केले़परंतु कधी खरीप हंगामाची काढणी, कधी निधीची वाणवा आदीने कामाला खीळ बसली़

- गंगाधर तोगरेकंधार ( नांदेड ) : तालुका पाणंदमुक्ती करण्यासाठी नानाविध अडथळ्याची शर्यत पार करताना दमछाक होत आहे़ निधीची वानवा दूर झाल्यानंतर आता पाणंदमुक्तीचा गाडा सुरळीत पार पडणार असे वाटत होते़ परंतु रेती तुटवड्यात पाणंदमुक्ती रुतली असल्याचे चित्र आहे़ त्यामुळे तालुका पाणंदमुक्तीचा मुहूर्त लांबणीवर जात असल्याचे समोर आले आहे़

तालुका पाणंदमुक्त करण्यासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदयसिंग राजपूत व सहाय्यक गटविकास अधिकारी कैैलास बळवंत यांनी विविध टप्पे केले़ त्यातून ११६ ग्रामपंचायती पाणंदमुक्त करण्यासाठी योग्य नियोजन केले़ त्यासाठी विस्तार अधिकारी शिवाजी ढवळे, बी़एम़ कोठेवाड, टी़टी़ गुट्टे, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामस्थ झपाटून शौचालय बांधकामासाठी सरसावले़ परंतु कधी खरीप हंगामाची काढणी, कधी निधीची वाणवा आदीने कामाला खीळ बसली़ मात्र  वरिष्ठ स्तरावरून निधीची पूर्तता करण्यासाठी सहकार्य मिळाले़ फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २ कोटींचा निधी तालुका स्तरावर प्राप्त झाला़ त्याचा विनियोग करण्याचे योग्य नियोजन केले़ १७ गावे त्यातून पाणंदमुक्त करण्याचे निश्चित झाले़ 

तालुक्यात अद्याप ५९ गावे पाणंदमुक्त होण्यासाठी धडपडत आहेत़ बोरी खु़, कौठा, धर्मापुरी मजरे, शिराढोण, रूई, शिरसी बु़, पांगरा, नारनाळी, आलेगाव, राऊतखेडा, दैठणा, पानशेवडी, शिरूर, हाळदा, हाडोळी ब्ऱ, नागलगाव, उमरज, मानसिंगवाडी, मंगनाळी, कंधारेवाडी, मंगलसांगवी, दिग्रस बु़, दाताळा, दिग्रस खु़, फुलवळ, पोखर्णी, रामानाईकतांडा, आंबुलगा, विजेवाडी, हाटक्याळ, सावरगाव (नि़), कोटबाजार, पोनभोसी, शेकापूर, संगुचीवाडी, बाचोटी, येलूर, कुरुळा, बामणी, बोरी बु़, उस्माननगर, दहीकळंबा, शेल्लाळी, लाडका, पेठवडज, कल्हाळी, वहाद, गुंटूर, तेलूर, औराळ, घागरदरा, गोणार, गऊळ, घोडज, धानोराकौठा, नंदनवन, खंडगाव (ह), चिखली, मसलगा या गावातील ९ हजार ५८५ शौचालये बांधकामे पूर्ण झाल्यानंतर तालुका पाणंदमुक्त होणार आहे़ मार्च अखेरपर्यंत तरी तालुका पाणंदमुक्त होणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ कारण ४ ते ५ हजार ब्रास रेतीचे दर झाले आहेत़ मातीमिश्रीत जुनी रेतीला भाव मिळत आहे़ त्यामुळे मिळणारा निधी व बांधकामाचा खर्च कसा जुळवायचा हा प्रश्न आहे़ रेतीचा तुटवडा, त्यात पदरमोड करण्यासाठीची स्थिती, दुष्काळ, गारपीटीमुळे लाभार्थ्यांची राहिली नाही़ 

२ कोटीतून ६० गावांतील कामावर केले लक्ष केंद्रितशिल्लक गावातील शौचालयाची कामे पूर्ण करण्यासाठी जिल्हास्तरावर ६ फेब्रुवारी रोजी बैठक घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत तालुका पाणंदमुक्त करण्याचे सूचित केले़ त्यासाठी चौदाव्याा वित्त आयोगातील शिल्लक व पहिला हप्ता अशी १० कोटी ७७ लाख व २ कोटीतून ६० गावातील कामावर लक्ष केंद्रित करण्यात आले़ १० हजार ५१९ शिल्लक बांधकामे पूर्ण करण्यासाठी १५ फेब्रुवारीची तारीख देण्यात आली़ परंतु १४ फेब्रुवारीपर्यंत त्यातील फक्त ९३४ शौचालयाची बांधकामे करण्यात आली़  १ गाव पाणंदमुक्त होऊन एकूण पाणंदमुक्त गावाची संख्या ५७ झाली.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानNandedनांदेड