आदिवासी परधान समाजाच्या वतीने आमदार भीमराव केराम व गुणवंत विद्यार्थी प्रशासकीय सेवेत रुजू झालेल्या तरुण-तरुणी तसेच इतर क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार गोकुंदा येथील उत्तमराव राठोड आदर्श विद्यालयाच्या प्रांगणात ३१ जानेवारी रोजी करण्यात आला.
अध्यक्षस्थानी आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते नारायणराव सिडाम, तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी सेवक रामदास कनाके, नगरसेविका जिजाबाई मेश्राम, उत्तम मेश्राम, शेषराव कोवे, राजाराम कोवे आदींची उपस्थिती होती.
यावेळी निवृत्त कर्मचारी माधवराव कुमरे, कचरूमन चौधरी, अनिल कुलसंगे, नव्यावे प्रशासकीय सेवेत रुजू झालेले दिलीप कनाके, कपिल तलांडे, स्मिता पोहरकर, डॉ. रत्नमाला सिडाम, डॉ, अजय कनाके, डॉ, तुषार धुर्वे, डॉ. बालकिशन चौधरी, डॉ. रवि डोंगरे, विक्रम चौधरी, डॉ. रोहन मेश्राम, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य अजय कोवे, गोविंद धुर्वे, राधाबाई कनाके, निखिल धुर्वे, गोंडवाना दिनदर्शिकेचे लक्ष्मण कनाके, मीडिया प्रतिनिधी प्रणय कोवे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मोहन कोवे, सुनील सिडाम, नीलकंठ कनाके, प्रभू आत्राम, सुभाष कनाके, सरपंच पुंडलिक घोडाम, बालाजी कनाके, मनोहर मेश्राम, कपिल कोवे, गंगाधर परचारे, अनिल तोडसाम, सुखदेव डोंगरे आदी उपस्थित होते, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय सिडाम , गोपाल कनाके, रामदास मेश्राम, जितेंद्र कुलसंगे, तानाजी घोडाम, रमेश परचाके, संतोष कनाके आदींनी परिश्रम केले, तर सूत्रसंचलन रामस्वरूप मडावी, तर आभार श्याम डोंगरे यांनी मानले.