सप्तरंगी साहित्य मंडळाच्यावतीने कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन तसेच ग्रामीण कवी नागोराव डोंगरे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जगदीश कदम बोलत होते. ते म्हणाले, विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी स्थानिक लेखकांना ६० टक्के या प्रमाणात प्राधान्य द्यायला हवे होते. परंतु, तसे झाले नाही. हा स्थानिक लेखकांवर एकप्रकारे अन्याय असल्याची भावना कदम यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास प्रा. निर्मलकुमार सूर्यवंशी, ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे, समीक्षक गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, श्रीकांत मगर, साईनाथ रहाटकर यांची उपस्थिती होती.
खुरगाव येथील श्रामणेर प्रशिक्षण केंद्रातही नागोराव डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भदंत पंय्याबोधी थेरो यांच्यासह भिक्खू संघ, अनुरत्न वाघमारे, गंगाधर ढवळे, निवृत्ती लोणे, भाटापूरकर आदी उपस्थित होते.