लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : नगरपालिका निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २४ नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे एबी फॉर्म दाखल केल्याने काँग्रेस व राष्टÑवादीची आघाडी बिघडल्यात जमा आहे, तथापि अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे ३० नोव्हेंबरपर्यंत आघाडीचा प्रयत्न असेलच असे माजीमंत्री आ़डी़पी़ सावंत, आ़ प्रदीप नाईक व काँग्रेस जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर यांनी संयुक्तपणे पत्रकारांना सांगितले़आघाडीबाबत काँग्रेस नेते माजीमंत्री डी़पी़ सावंत, आ़ प्रदीप नाईक यांची बैठक किशनराव किनवटकर यांच्या निवासस्थानी घेण्यात आली़ ९ प्रभागांतील १८ जागांपैकी प्रत्येकी ९ जागा काँग्रेस व राष्टÑवादीला देण्याचे ठरले. त्यानुसार एबी फॉर्म दाखल करताना राष्टÑवादीने काँग्रेसच्या वाट्यातील प्रभाग क्र.५ व ७ मध्ये एबी फॉर्म दाखल केल्याने काँग्रेस नेते संतापले व दोघाही पक्षाच्या उमेदवारांनी एबी फॉर्म दाखल केला. यावर आता आघाडीचा चेंडू आ़ प्रदीप नाईक यांच्या हातात आहे़ त्यांनी सकारात्मक निर्णय घेत पावले उचलावी, अशी प्रतिक्रिया माजीमंत्री आ़ सावंत यांनी दिली़ तर आघाडीसाठीही आमचा प्रयत्न राहील असे आ़ नाईक यांनी सांगितले़निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उपरोक्तांसह किशोर भवरे, कैलास राठोड, नारायणराव श्रीमनवार, शमीम अब्दुल्ला, निलेश पावडे, तिरुपती (पप्पू) कोंडेकर किनवटमध्ये दाखल झाले होते़
किनवट नगरपालिका निवडणूक ; आघाडीचा फैसला ३० नोव्हेंबरपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 1:06 AM