लक्ष्मण तुरेराव ।लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद : येथील शासकीय गोदामात किनवट येथील नाफेडचा ६० टन माल उतरविण्यास शेतकऱ्यांनी विरोध दर्शविल्याने नाफेड खरेदी केंद्र, खरेदी-विक्री संघ व मार्केट कमिटीत एकच खळबळ निर्माण झाली़ येथील शासकीय गोदामात सावळागोंधळ सुरू असल्याची बाब शेतक-यांनी निर्दशनास आणून दिली़धर्माबाद तालुक्यात शेतक-यांची समस्या असताना येथील शासकीय वखार महामंडळ व नाफेड यांच्या संगनमताने किनवट येथील नाफेडचा दोन लॉरी वाहतुकीतील ६० टन माल धर्माबाद येथील शासकीय गोदामात उतरविण्यात येणार होता़ मात्र हा प्रकार शेतकºयांच्या लक्षात येताच माल उतरविण्यास विरोध दर्शविला़दरम्यान, एका लॉरीतील ३० टन माल उतरविला. वखार महामंडळातील ग्रेडर वीर यांनी दुसºया लॉरी वाहनातील माल डागी (निकृष्ट) आहे़ माल घेत नसल्याचे किनवट येथील नाफेडला कळविले़ त्यानंतर किनवटहून दोन व्यक्ती कारमध्ये धर्माबादला येऊन माल का घेत नाही? मी बाजार समितीचा सचिव आहे, सभापती आहे, असे म्हणून गोंधळ घालत होते़ तेव्हा शेतकºयांनी धर्माबाद पोलिसांना फोन करुन हा प्रकार कळविला, तेव्हा या व्यक्तींनी कारसह पलायन केले़सदरील तुरीची तपासणी करण्यात आली तेव्हा चार वर्षांपूर्वीचा निकृष्ट माल असल्याचे आढळून आले. मालाच्या पावतीची तपासणी केली असता सदरील पावतीवर खाडाखोड केलेलेही दिसून आले.किनवटहून आलेला माल नाफेडचा असेल तर निकृष्ट दर्जाचा माल खरेदी का केला? सदरील व्यक्ती सभापती, सचिव स्वत:ला समजणारे पळून का गेले? धर्माबादला माल ठेवण्यास जागा उपलब्ध नाही म्हणून येथील नाफेडने खरेदी बंद केली असून बाहेर तालुक्यातील माल ठेवण्यास जागा कशी मिळाली? येथील गोदाम असल्यामुळे प्रथम धर्माबादला प्राधान्य द्यायला पाहिजे? म्हणजेच धर्माबादचे गोदाम असून येथील शेतकरी उपाशी, बाहेरील शेतकरी तुपाशी, अशा एक ना अनेक प्रश्नांचा भडीमार येथील शेतकरी गंगाधर मिसाळे, शिवराज गाडीवान, बाबूराव पाटील आल्लुर, भगवान कांबळे, सुमित बनसोडे, बालाजी कुदाळे, गंगाधर धडेकर, राजू सोनकाबंळे, उदयकिरण वाघमारे यांनी केला.धर्माबादचे खरेदी- विक्री संघाचे चेअरमन नागनाथ पाटील बुठ्ठे, वखार महामंळाचे ग्रेडर वीर नाफेडचे साखरे उपस्थित होते़ शुक्रवारी दिवसभर हा विषय चर्चेत होता़जागा नाही,मग बाहेरचा माल कसा ठेवणार?मालाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकºयांनी लावून धरली. सदरील माल किनवट येथील नाफेडचा आहे की व्यापाºयाचा? हे अद्याप समजले नसून दोन लॉरी वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले. उशिरापर्यंत चौकशी सुरु होती. या प्रकारामुळे नाफेड खरेदी केंद्र, खरेदी-विक्री संघ व मार्केट कमिटीत एकच खळबळ उडाली़ किनवटहून आलेला माल निकृष्ट दर्जाचा असताना का खरेदी केला? धर्माबादला माल ठेवण्यास जागा उपलब्ध नाही म्हणून खरेदी बंद केली़ आता बाहेरच्या तालुक्यातील माल ठेवण्यास जागा कशी उपलब्ध झाली? असे प्रश्न शेतकºयांनी उपस्थित केले़धर्माबाद नाफेड खरेदी केंद्राने गोदामात माल ठेवण्यास जागा उपलब्ध नसल्याचे कारण दाखवून धर्माबाद येथील नाफेड तूर खरेदी केंद्र बंद ठेवले होते. त्यामुळे शेतकरी नाराज झाले. पैशाची गरज असलेले शेतकरी नाईलाजाने कमी दरात खाजगी व्यापाºयांकडे तूर विक्री केली तर काही शेतकरी खरेदी केंद्र, आज ना उद्या सुरु होईल या आशेने माल घरातच ठेवला आहे.
धर्माबादच्या गोदामात किनवट नाफेडची तूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:58 AM