लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : कोरेगाव-भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहीत आहे़ या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठीशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले़ हल्लाबोल यात्रेच्या दुसºया टप्प्यात मराठवाड्यात २६ सभा घेणार असून या माध्यमातून शेतकºयांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले़मुंडे यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला़ कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्य शासनाने १ तारखेपूर्वी अनेक बाबी हाताळण्याची आवश्यकता होती़ मात्र त्याकडे कानाडोळा केल्यानेच १ तारखेची दुदैवी घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले़ डिसेंबरमध्ये राष्ट्रवादीच्या वतीने हल्लाबोल यात्रा काढण्यात आली होती़ ११ दिवस चाललेल्या या यात्रेच्या माध्यमातून शेतकºयांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यात आला़ सरकार त्यावेळी पूर्णत: हतबल दिसले़ आमच्या मागण्यांनुसार त्यांनी काही निर्णयही घेतले, परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही़ त्यामुळेच येत्या १६ तारखेपासून तुळजापूर येथून हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील २७ विधानसभा मतदारसंघात या अंतर्गत २६ सभा घेण्यात येणार आहेत़ या यात्रेत माझ्यासह राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खा़ सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांच्यासह सर्व नेते सहभागी होणार असून यात्रेचा समारोप ३ फेब्रुवारीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढून होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली़शेजारचे तेलंगणा राज्य शेतकºयांना कर्जमाफी देते़ त्यासोबतच २४ तास सलग वीज पुरवठा आणि तोही मोफत दिला जातो़तेलंगणासारख्या छोट्या राज्याला हा निर्णय घेता येतो़ मग महाराष्ट्र शासन याबाबत उदासीन का ? असा सवाल करीत शेतकºयांना मोफत वीजपुरवठा देण्याची मागणी या यात्रेच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले़हल्लाबोल यात्रा २० जानेवारी रोजी नांदेड जिल्ह्यात येणार आहे़ या दिवशी लोहा येथे सभा घेतल्यानंतर २१ रोजी दुपारी १ वाजता उमरी येथे तर सायंकाळी ५ वाजता माहूर येथे या यात्रेच्या माध्यमातून जाहीर सभा घेण्यात येणार असल्याची माहितीही मुंडे यांनी दिली़हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापूस उत्पादक शेतकºयांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी आम्ही केली होती़ यावर केंद्र, राज्य तसेच बी-बियाणे कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकºयांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते़ प्रत्यक्षात बी-बियाणे कंपनीने अशी भरपाई देण्यास नकार दिल्याने सरकारने केलेली बोंडअळी बाबतच्या मदतीची घोषणा फसवी असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले़‘मौका सभी को मिलता है ’देश पातळीवर समविचारी पक्षाने एकत्रित यावे असा सूर आहे़ त्यामुळेच नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या मोर्चाच्या समारोपाची सभा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत एकत्रित घेण्यात आली़ याच्यापुढे जात नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत आम्ही काँग्रेसच्या सहकार्याने अध्यक्षपद मिळविले़ मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना जिल्ह्यातील स्थानिक काँग्रेसच्या नेत्यांनी विश्वासात घेणे गरजेचे आहे़ स्थानिक पातळीवर दुजाभाव होत असेल तर ‘मौका सभी को मिलता है ’अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला इशारा दिला़
सरकारच्या पाठबळामुळेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट -धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 11:59 PM