प्राप्त झालेल्या १ हजार ५६० अहवालापैकी १ हजार २५३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता २५ हजार ४४० एवढी झाली असून यातील २३ हजार २०४ बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. सध्या जिल्हयातील विविध रुग्णालयात १ हजार ४१३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील ३८ बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे.
गुरुवारी पिरबुऱ्हानगर नांदेड येथील ६५ वर्षाच्या एका महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत कोविड-१९ मुळे जिल्ह्यातील ६०८ व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी ३, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ४३, किनवट कोविड रुग्णालय ७, खाजगी रुग्णालय २०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ७, देगलूर कोविड रुग्णालय १, लोहा तालुक्यांतर्गत २ असे एकूण ८३ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९१.२१ टक्के आहे.
आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ८८, अर्धापूर तालुक्यात २, हदगाव २, कंधार १, मुदखेड १, उमरी २, यवतमाळ २, नांदेड ग्रामीण ४, धर्माबाद २, हिमायतनगर २, लोहा ८, मुखेड ३, हिंगोली १ असे एकूण ११८ बाधित आढळले.
आजच्या बाधितांमध्ये ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १०१, अर्धापूर तालुक्यात १, देगलूर ३, बिलोली १, मुखेड ६, नांदेड ग्रामीण २, भोकर १६, धर्माबाद १, लोहा १ असे एकूण १३२ बाधित आढळले.
जिल्ह्यात १ हजार ४१३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे ७३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ८८, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) ६५, किनवट कोविड रुग्णालयात ३६, मुखेड कोविड रुग्णालय २५, हदगाव कोविड रुग्णालय ९, महसूल कोविड केअर सेंटर ९९, देगलूर कोविड रुग्णालय ७, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण ६५४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण २३६, खाजगी रुग्णालय १२१ आहेत. दरम्यान, गुरुवारी सायंकाळी ५ वा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे १२१ तर जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे १६ खाटांची उपलब्धता होती.