शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

सरकार पाठिशी असल्याने कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट; धनंजय मुंडे यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 2:42 PM

कोरेगाव - भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहित आहे. या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठिशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

ठळक मुद्देकोरेगाव - भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहित आहे. या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार आहे सरकार पाठिशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.

नांदेड :कोरेगाव - भीमामध्ये झालेला हल्ला कुणी केला ? ते सरकारला माहित आहे. या संपूर्ण दंगलीला राज्य शासनच जबाबदार असल्याचा आरोप करीत सरकार पाठिशी असल्यानेच कोरेगाव-भीमाचे आरोपी मोकाट असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. हल्लाबोल यात्रेचा दुसर्‍या टप्प्यात मराठवाड्यात २६ सभा घेणार असून यामाध्यमातून शेतकर्‍यांच्या प्रलंबीत प्रश्नाबाबत सरकारला निर्वाणीचा इशारा देण्यात येणार असल्याचे ही ते म्हणाले.

मुंडे यांनी सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला़ कोरेगाव-भीमा प्रकरणी राज्यशासनाने १ तारखेपूर्वी अनेक बाबी हाताळण्याची आवश्यकता होती. मात्र, त्याकडे कानाडोळा केल्यानेच १ तारखेची र्दुदैवी घटना घडल्याचेही त्यांनी सांगितले़ डिसेंबरमध्ये राष्ट्रवादीच्यावतीने हल्लाबोल यात्रा काढण्यात आली होती़ ११ दिवस चाललेल्या या यात्रेच्यामाध्यमातून शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यात आला़ सरकार त्यावेळी पुर्णत: हतबल दिसले़ आमच्या मागण्यानुसार त्यांनी काही निर्णयही घेतले. परंतू, त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही़ त्यामुळेच येत्या १६ तारखेपासून तुळजापूर येथुन हल्लाबोल यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार असूऩ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील २७ विधानसभा मतदार संघात या अंतर्गत २६ सभा घेण्यात येणार आहेत़ या यात्रेत माझ्यासह राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खा़ सुप्रियाताई सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक यांच्यासह सर्व नेते सहभागी होणार असूऩ यात्रेचा समारोप ३ फेब्रुवारीला पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्तालयावर मोर्चा काढुन होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रात मोफत वीज का नाही ?शेजारचे तेलंगणा राज्य शेतकर्‍यांना कर्जमाफी देते़ त्यासोबतच २४ तास सलग वीज पुरवठा आणि तो ही मोफत दिला जातो़ तेलंगणा सारख्या छोट्या राज्याला हा निर्णय घेता येतो़ मग महाराष्ट्र शासन या बाबत उदासिन का ? असा सवाल करीत, शेतकर्‍यांना मोफत वीज पुरवठा देण्याची मागणी या यात्रेच्या माध्यमातुन करण्यात येणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

कापुस उत्पादक शेतकर्‍यांची फसवणुक हल्लाबोल यात्रेच्या माध्यमातून बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या कापुस उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार मदत देण्याची मागणी आम्ही केली होती़ यावर केंद्र, राज्य तसेच बी-बियाणे कंपनीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते़ प्रत्यक्षात बी-बियाणे कंपनीने अशी भरपाई देण्यास नकार दिल्याने सरकारने केलेली बोंडअळी बाबतच्या मदतीची घोषणा फसवी असल्याचे स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.

‘मौका सभी को मिलता है ’देश पातळीवर समविचारी पक्षाने एकत्रित यावे असा सूर आहे़ त्यामुळेच नागपूर अधिवेशनावेळी झालेल्या मोर्चाच्या समारोपाची सभा काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या उपस्थितीत एकत्रित घेण्यात आली़ याच्या पुढे जात नांदेड जिल्हा बँक निवडणूकीत आम्ही काँग्रेसच्या सहकार्याने अध्यक्षपद मिळविले़ मात्र राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांनी विश्वासात घेणे गरजेचे आहे़ स्थानिक पातळीवर दुजाभाव होत असेल तर ‘मौका सभी को मिलता है ’अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला इशारा दिला.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाGovernmentसरकार