येथील विठ्ठलनगर सांस्कृतिक सभागृहात आयोजित क्रांतिगुरु लहुजी राघोजी साळवे यांच्या २२६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते क्रांतिगुरु लहुजी साळवे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी भारत खडसे हे होते. तर उद्घाटन इंजि. भाऊसाहेब घोडे यांनी केले.
प्रा.सदाशिव भुयारे म्हणाले, १८१७ च्या खडकीच्या पेशवे आणि ब्रिटिशांच्या लढाईत राघोजी साळवे यांनी हजारो ब्रिटिश सैनिकांचा शिरच्छेद करून तब्बल ४ दिवस खिंड लढवली होती. दुसरा बाजीराव यांच्या पळकुट्यापणामुळे राघोजी साळवे यांना शहीद व्हावे लागले. त्याचवेळी वडील राघोजी साळवे यांच्या विरमरणाची रक्त आपल्या कपाळावर लावून क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी शपथ घेतली की ‘जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी’ खडकीच्या लढाईत राघोजी साळवे शहीद झाल्यामुळे दुसरा बाजीराव पळून जाऊन कोरेगाव भीमा येथे लपून बसला होता. त्यावेळी ५०० ब्रिटिश महार बटालियनच्या सैन्याचा २८ हजार पेशव्यांचा दारुण पराभव केला होता. कोरेगाव भीमाच्या लढाईमुळे दुसऱ्या बाजीरावांचा अंत व शस्त्रधारी पेशवाईचा अंत झाला. परंतु क्रांतिगुरु लहुजी साळवे यांनी हार मानली नाही. ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा तीव्र करण्यासाठी पुणे येथे गंजपेठेत क्रांतिकारकांना प्रशिक्षण देण्यासाठी सशस्त्र प्रशिक्षण केंद्र सुरू केले ज्यात तात्या टोपे, वासुदेव बळवंत फडके, राष्ट्रपिता जाेतिराव फुले, बाळ गंगाधर टिळक यासारख्या असंख्य सशस्त्र क्रांतिकारकांना घडवले, असे प्रतिपादन प्रा.भुयारे यांनी केले.
प्रास्ताविक प्रदीपअण्णा वाघमारे यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. राज सूर्यवंशी यांनी तर आभार गणेश मोरे यांनी मानले. कार्यक्रमास पोचीराम कांबळे यांचे नातू ज्युनियर कांबळे, काळे, चंद्रकांत गुंडाळे, पांडुरंग गायकवाड, उत्तम हातागळे, चेतक काळे, बी.एस. घोणसेटवाड, बाबू कांबळे, उत्तम आंबेकर, प्रसाद गायकवाड, विशाल केदारे, तपासकर, वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.