राजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : बहुचर्चित कृष्णूर शासकीय धान्य घोटाळा बिलोली व देगलूर या दोन तालुका पुरवठा विभागात झाला़ दोन्ही मार्गावर प्रत्येकी दोन टोलनाके आहेत़ एका टोलनाक्यावर १९३ ट्रकची नोंदच नाही़ परिणामी शासकीय धान्य इंडिया मेगा अनाज कंपनीत गेल्याचा पुरावा पोलिसांच्या हाती लागला़ वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांच्या पहिल्या टप्प्यातील वाहतुकीसाठी शासनाकडे नोंद असलेल्या ५८ पैकी १८ ट्रकवर जीपीएस यंत्रणाच नव्हती़ जीपीएस नसलेल्या ट्रकमधूनच हजारो क्विंटल शासकीय धान्याची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली़बिलोलीच्या न्यायालयात जयप्र्रकाश तापडिया व ठेकेदार राजू पारसेवार यांच्या अटकपूर्व जामिनाला विरोध करताना पोलिसांनी तीन वेगवेगळे अहवाल सादर केले़ जानेवारी ते जुलैपर्यंतचे सर्व रेकॉर्ड अडीच महिन्यांत जप्त करण्यात आले़मार्च २०१८ पर्यंत वाहतूक ठेका तुकाराम महाजन यांच्याकडे होता़ त्यामुळे आताचे व पूर्वीचे दोन्ही ठेकेदार कायद्याच्या कचाट्यात सापडले़ प्रामुख्याने बिलोली, देगलूरपाठोपाठ मुखेड पुरवठा विभागाचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचे पोलिसांच्या अहवालात नमूद करण्यात आले़ पोलिसांनी प्रात्यक्षिक स्वरुपात दोन्ही तालुका गोदामांची तपासणी केली़ अर्जापूर व नायगाव येथील स्वस्त धान्य दुकानांची झाडाझडती घेतल्यानंतर सबळ पुरावे पोलिसांच्या हाती लागले़लाभार्थ्यांच्या पदरात अर्धाच मालबिलोली, देगलूर तालुक्यांतील स्वस्त धान्य दुकानदार दरमहा पूर्ण क्षमतेच्या धान्याची मागणी करतात़ प्रत्यक्षात अर्धाच माल लाभार्थ्यांच्या पदरात पडतो, असे पुरावे पोलिसांना मिळाले़ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील धान्य वितरण व्यवस्थेच्या प्रणालीचा घोळ व हेराफेरी करण्याची पद्धत न्यायालयात स्पष्ट करण्यात आली़भुशाला धान्य दाखवून कर्ज उचलले१८ जुलै रोजी इंडिया मेगा कंपनीत छापा टाकल्यानंतर गोदामात सहा हजार भरलेली पोती आढळली़ प्रत्यक्षात २ हजार पोत्यात धान्य होते़ दर्शनी भागात धान्याची पोती दाखवून मागच्या पोत्यात भुसा भरलेला होता़ पुरवठा विभागाने मोजदाद केल्यानंतर पुढच्या रांगेतून १७९८ पोती गहू व मागे १२ हजार ८९२ पोत्यांत साळीचा भुसा मिळाला़ अशा साठ्यावरच कंपनीने बँक प्रशासनाची दिशाभूल करत कोट्यवधींचे कर्ज उचलले़ भुशाला धान्य समजल्याची गफलत, थैल्यांची रास जमवल्याने झाले असे निष्पन्न झाले़ कॅश क्रेडीटसाठी अशा बोगस धान्याचा साठा दाखवल्याचे पुढे आल्याने बँकांनी संबंधितांवर कारवाई करावी, अशी पत्रे बँकांना देण्यात आली़भुसार व्यापा-यांच्या बोगस पावत्याज्या ट्रकमधून धान्य विकल्याच्या पावत्या १९ भुसार व्यापाºयांनी दिल्या ते सर्व ट्रक क्रमांक बोगस निघाले़ अशी १९३ व ५६ ट्रकची यादी तपासण्यात आली़ अशा ट्रकचे देयके, पावत्यांचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले़ परभणी, लातूर, जालना, नांदेड, अकोला येथील ट्रेडींग भुसार व्यापाºयांचे छापलेले वेगवेगळे बिले-वे-बील कारखान्यात सापडले़ शासकीय धान्य घेवून खाजगी बिल तयार करण्यात आल्याचे यावरून स्पष्ट झाले़ मुनीम, नोकर, दलाल यांच्या बँक खात्यामधून असंख्य आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले़बिलोली, देगलूर, मुखेडचे ट्रक गोदामला पोहोचलेच नाहीटोलनाका कॅमेरा, नोंदी, रिपोर्ट, पुरवठा विभागाचे तात्पुरता परवाना यांची जुळवणी पोलिसांनी केली़ तेव्हा बिलोली ७२ ट्रक, देगलूर ९० तर मुखेडचे १५ ट्रक तालुका गोदामात पोहोचलेच नाहीत़ तथापि, तालुका ई-रजिस्टरवर ट्रक पोहोचल्याच्या नोंदी करण्यात आल्या़ या मार्गावर दोन टोलनाके आहेत़ येथील नोंदीवरुनकाही ट्रक तर दिवसातून दोन-दोन फेºया करून तुप्पा ते कृष्णूर असा माल उतरविल्याचा पुरावा पोलिसांना सापडला़नुरुल हसन यांच्यावर राजकीय दबावकृष्णूर धान्य घोटाळ्याचा तपास प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे आहे. या घोटाळ्यातील बड्या माशांच्या नाड्या त्यांनी आवळून तपास अगदी योग्य रितीने केल्याने काही राजकीय पुढारी त्यांच्यावर दबाव आणत आहेत. तपास सीआयडीकडे द्या, अन्य कोणत्याही अधिकाºयांकडे सोपवा, मात्र नुरुल हसन यांच्याकडे नको, अशी भूमिका घेवून काहींनी हसन यांच्याकडील घोटाळ्याचा तपास काढून घेण्यासाठी जंगजंग पछाडले आहे.
कृष्णूर धान्य घोटाळा; टोलनाक्यावर १९३ ट्रकची नोंदच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 1:35 AM