ओंकारेश्वर नगरातून मोबाईल लांबविला
नांदेड : शहरातील ओंकारेश्वर नगर भागातून एका घरातून चोरट्याने मोबाईल लंपास केला. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली. हितेश नानाजी टोकणे यांच्या घरात सकाळी साडेनऊ ते १० वाजताच्या दरम्यान चोरट्याने प्रवेश करून १० हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला. या प्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पैशाच्या मागणीसाठी दोन विवाहितांचा छळ
नांदेड : प्लॉट घेण्यासाठी माहेराहून ५ लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. तर दुस-या घटनेत टॅक्सी कार घेण्यासाठी विवाहितेला ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात भाग्यनगर पोलिसांनी सासरच्या मंडळीच्या विरोधात गुन्हा नोंद केला.
पीडितेला पैशाच्या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून नेहमी त्रास दिला जात होता. त्यानंतर पीडितेने याबाबत महिला सहाय्य कक्षात तक्रार दिली होती. परंतु या ठिकाणी त्यांच्यामध्ये समेट झाली नाही. त्यानंतर पीडितेने भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून करुणा भवरे, शेषराव भवरे, संदीप भवरे, सुनीता कावळे, कल्पना कावळे, स्वाती भवरे, विशाल भवरे, भीमाबाई भगत, भगवान भगत यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर दुस-या घटनेत टॅक्सी कार घेण्यासाठी पीडितेला माहेराहून ५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. या पीडितेनेही महिला सहाय्य कक्षात धाव घेतली होती. या प्रकरणात शाम पुरुषोत्तम टाक, शोभाबाई टाक, पुरुषोत्तम टाक, राम टाक, कविताबाई टाक, सोनी टाक, आशाबाई मारोती टेहरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.