नांदेड : मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून रखडला आहे़ आजघडीला हा प्रकल्प अर्धवट असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असून २०२० अखेर प्रकल्पात पाणी अडविण्यात येणार आहे़ अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली़जिल्ह्याच्या दृष्टीने लेंडी प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे़ परंतु, गेल्या अनेक वर्षांपासून तो या- ना- त्या कारणांनी रखडला आहे़ हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांची काही दिवसांपूर्वीच बैठक झाली. या बैठकीत प्रकल्पाचे काम वेगाने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ लेंडी प्रकल्पाला १९८६ मध्ये मंजुरी मिळाली होती़ यावेळी प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्यांचा विरोध व इतर कारणांमुळे हा प्रकल्प आजपर्यंत पूर्ण होवू शकला नाही़ त्यामुळे ५४ कोटींचा हा प्रकल्प २ हजार कोटीवर पोहोचला आहे़ दरवर्षी प्रकल्पाची रक्कम वाढतच आहे़ प्रकल्पामुळे जवळपास साडेपाच हजार कुटुंब विस्थापित होणार होती़ परंतु, आता त्यामध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे़ विस्थापितांसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून काही ठिकाणी गावठाण परिसरांचा विकास करण्यात येणार आहे़ डांबरी रस्त्यांऐवजी सिमेंट रस्ते तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली आहे़ लेंडी प्रकल्पाबरोबरच जिल्ह्यातील पुनर्वसितांचे प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत़ नांदेड विमानतळाच्या विस्तारात संपादित केलेल्या शेतकऱ्यांचा प्रश्नही प्रलंबित आहे़ लेंडी प्रकल्पामध्ये येत्या २०२० पर्यंत पाणी अडविण्यात येणार आहे़ त्यासाठी संबंधित विभागांना वेगाने कामे पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही भंडारी म्हणाले़यावेळी आ. तुषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, लेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता रा. मा. देशमुख, डॉ. संतुक हंबर्डे, प्रवीण साले उपस्थित होते.विस्थापितांना मिळणार मावेजाची रक्कमलेंडी प्रकल्पांतर्गत ११ गावे बाधित झाली होती. त्यापैकी रावणगाव व गावठाण परिसर पूर्णत: बाधित होणार आहे. उर्वरित गावे काहीअंशी बाधित झाली आहेत.मुक्रमाबाद वगळता अन्य गावांतील विस्थापितांना शासनाने मावेजा दिला आहे. लेंडी प्रकल्पासाठीचे ४९ कोटी रुपये शिल्लक असून यापैकी ५० टक्के रक्कम कामासाठी उर्वरित रक्कम विस्थापितांना देण्यात येणार आहे.त्यामुळे विस्थापितांवर झालेला अन्याय दूर होणार आहे़
२०२० पर्यंत लेंडी प्रकल्पात अडविण्यात येणार पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 12:56 AM
मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प गेल्या ३३ वर्षांपासून रखडला आहे़ आजघडीला हा प्रकल्प अर्धवट असून तो लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करण्यात येणार असून २०२० अखेर प्रकल्पात पाणी अडविण्यात येणार आहे़ अशी माहिती राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा पुनर्स्थापना सनियंत्रण समितीचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी दिली़
ठळक मुद्देमाधव भंडारी ३३ वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न