यासोबत मुख्य अन्नघटक असलेल्या स्फुरदचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले आहे. सहा हजार १०५ मातीच्या नमुन्यांपैकी चार हजार ८५३ नमुन्यांत स्फुरदचे प्रमाण कमी आढळले आहे. या भागात अम्लधर्मी जमिनीच्या प्रमाणतही वाढ होत आहे. यासोबतच सूक्ष्म अन्नद्रव्याच्या ४०९ नमुने तपासणीत लोहाचे प्रमाण कमी आले आहे तर झिंक, मॅग्निज व कॉपरचेही प्रमाण मध्यम असल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनीत रासायनिक खतांचा अतिवापर, सेंद्रिय खते, हिरवळीचे खते, कुजलेले शेणखत जैविक खतांची कमतरता यामुळे जमिनीचे आरोग्य धोक्यात आल्याने शेतकऱ्यांना पुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.
सेंद्रिय कर्ब म्हणजे काय?
जमिनीची सुपीकता म्हणजे सेंद्रिय कर्बाचे योग्य प्रमाण मानले जाते. जमिनीत ०.४१ ते ०.८० टक्के सेंद्रिय कर्बाचे प्रमाण असणे आवश्यक असते. हे प्रमाण ०.३० टक्क्यांच्या खाली आले तर जमीन पीक घेण्यायोग्य नसल्याचे मानले जाते. सेंद्रिय खते, हिरवळीची खते, कुजलेले शेणखत, जैविक खतांची मात्रा योग्य प्रमाणात दिल्यास सुपीकता वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
प्रतिक्रीया
आरसीएफच्या माती परीक्षण प्रयोगशाळेत शेतकऱ्यांच्या मातीचे परीक्षण करून जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येते. यात२०१९-२० मधील तपासणीत नांदेड जिल्ह्यातील जमिनीत सेंद्रिय कर्ब, स्फुरदचे प्रमाण घटल्याचे निष्पन्न झाले आहे.
- केदारनाथ काचावार, उपप्रबंधक, विपणन
भूमी परीक्षण प्रयोगशाळा, आरसीएफ, नांदेड.