जनविकास पॅनेल विजयी
मुखेड : तालुक्यातील तुपदाळ येथील ग्रामपंचायत निवडणुकीत संदीप घाटे यांच्या जनविकास पॅनेलने विजय मिळविला. पॅनेलचे प्रेमलाबाई घाटे, कंबळबाई इंगोले, अनिताबाई पिटलेवाड, कान्होपात्रा बोडके आदी विजयी झाले. दोघे बिनविरोध निवडून आले. विजयाबद्दल नूतन सदस्यांचा अनेकांनी सत्कार केला.
पाटील यांचा ताबा
मुदखेड : इजळी (ता.मुदखेड) येथील ग्रामपंचायत निवडणुकीत गोपीनाथ पाटील मुंगल यांच्या पंचकृष्ण ग्रामविकास पॅनेलने ९ पैकी ९ जागा मिळविल्या. विजयी उमेदवारांत कविताबाई मुंगल, सत्वशीला पांचाळ, प्रकाश हटकर, साहेबराव मुंगल, नागेश गोळेवाड, सुंदरबाई मुंगल, अरुणाबाई हटकर, अनिता मुंगल, सतीश मुंगल यांचा समावेश आहे.
शालेय साहित्य वाटप
नांदेड : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नसरतपूर, हस्सापूर, नवीन हस्सापूर येथील जिल्हा परिषद शाळेत आ. बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी पदाधिकारी दत्ता कोकाटे, अशोक उमरेकर, सचिन किसवे, उमेश दीघे, कुंवरचंद यादव, संतोष भारसावडे, रंगनाथ सरोदे आदी उपस्थित होते.
ग्रामविकास पॅनेलचे वर्चस्व
हदगाव : तालुक्यातील वायफना बु. ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनेलच्या ताब्यात गेली. या निवडणुकीत जयवंतराव पाटील, दत्तराम साबळे, गोविंदराव हुंडेकर, ज्योती बेळकोणे, मनीषा हुंडेकर, चांदराव भालेराव, यशोदा गाडगेराव, जयश्री शिंदे, चंद्रकला मेकलवार निवडून आले आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती
लोहा : मारतळा येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी स्कूलमध्ये सुभाषचंद्र बोस तसेच बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी झाली. अध्यक्षस्थानी सेनेचे उपजिल्हाप्रमुख प्राचार्य संजय पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक भीमाशंकर कापसे, उपसरपंच भास्कर ढगे, आशा ओपले, ज्योती कापसे, संजय पाटील ढागे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चांगुणा भरकडे यांनी केले तर कान्होपात्रा तिरमाले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रिया सामला, सुनिता झिंगाडे, सुनील तारू यांनी परिश्रम घेतले.
शिंदे यांना पुरस्कार
लोहा : राजीव गांधी विद्यालयातील उपक्रमशील शिक्षिका सुरेखा शिंदे यांना जिल्हा परिषद नांदेडतर्फे जिल्हास्तरीय सावित्रीबाई फुले पुरस्कार जाहीर झाला. प्रजासत्ताक दिनी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. शिंदे या विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकारीही आहेत.
चव्हाणांना निवेदन
धर्माबाद : अंशकालीन कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे निवेदन पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना धर्माबाद दौऱ्यात दिले. निवेदनावर शेषराव धावरे, नरसिंग आल्लूरकर, संजय भंडारे, म. अब्दुल रहीम, नागेश जाधव, प्रकाश सोळंके, संजय रेनगुंटवार आदींची नावे आहेत.
अवैध मुरुम उत्खनन
नायगाव : नायगाव तालुक्यातील मौज मेळगाव, होटाळा, कृष्णूर, अंतरगाव येथे हजारो ब्रास मुरुमाचे उत्खनन सुरू आहे. या संदर्भात आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकत्यांनी दिला. निवेदनावर अनेकांच्या सह्या आहेत.
मजुराची आत्महत्या
हदगाव : तालुक्यातील वायफना येथील मारोती संभाजी हेंबरे (४०) यांनी २२ जानेवारी रोजी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळले नाही. पोलिसांनी या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली. पोलीस नायक सुमकमवार तपास करीत आहेत.