शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

विकासासाठी नांदेडचे नेतृत्व जपूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 12:42 AM

जिल्ह्याचा विकास आणि चव्हाण कुटुंबिय यांचे नाते नेहमीच जुळले आहे़ समाजातील विविध क्षेत्रांतील मंडळीशी संवाद साधला व ही भावना पुढे आली़ शहरातील व्यापाऱ्यांनी नांदेडच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात कै़ शंकरराव चव्हाण यांच्यासह अशोकराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले़

नांदेड : जिल्ह्याचा विकास आणि चव्हाण कुटुंबिय यांचे नाते नेहमीच जुळले आहे़ समाजातील विविध क्षेत्रांतील मंडळीशी संवाद साधला व ही भावना पुढे आली़ शहरातील व्यापाऱ्यांनी नांदेडच्या विकासाच्या प्रत्येक क्षेत्रात कै़ शंकरराव चव्हाण यांच्यासह अशोकराव चव्हाण यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले़ प्रश्न, अडचणी, संकट कोणतेही असो, धाव चव्हाणांकडेच़ हीच बाब व्यापाऱ्यांशी साधलेल्या संवादातून पुढे आली़ आगामी काळातही त्यांच्याकडूनच विकासाची अपेक्षा शहरातील व्यापा-यांनी व्यक्त केली आहे़ एलबीटीच्या जाचातून व्यापाºयांची मुक्तता केल्याचे प्रांजळ मतही व्यापा-यांनी नोंदविले़चव्हाणांमुळेच विकासअशोकराव चव्हाण यांच्यामुळेच शहर आणि जिल्ह्याचा विकास झाला आहे़ यापूर्वी जिल्ह्याचे नेतृत्व दिवंगत शंकरराव चव्हाण यांनी केले़ तोच वसा आता अशोकराव चव्हाण यांनी घेतला आहे़ प्रत्येकवेळी शहर व जिल्ह्याच्या प्रश्नावर ते आक्रमकपणे आपली भूमिका मांडतात़ त्यामुळे नांदेडात विकास कामांना निधी मिळतो़ मुख्यमंत्रिपदाच्या काळात त्यांनी नांदेडला नेहमी झुकते माप दिले आहे़ त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे़  -प्रकाश निहलानी

उच्चशिक्षित, मितभाषीअशोकराव चव्हाण हे उच्चशिक्षित आणि मितभाषी नेते आहेत़ कोणतीही समस्या त्यांच्याजवळ घेवून गेल्यानंतर त्यावर तोडगा काढण्यासाठी ते परिश्रम घेतात़ व्यापाºयांना एलबीटीचा त्रास झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडे धाव घेतली होती़ त्यावेळी अशोकराव व्यापाºयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते़ त्यावेळी त्यांनी राज्य सरकारशी भांडण करुन व्यापा-यांची एलबीटीच्या त्रासातून मुक्तता केली़ त्यांच्याएवढा उच्चशिक्षित आणि मितभाषी उमेदवार विरोधी पक्षांकडे नाही़ इतरापेक्षा ते संयमी आहेत़ -अनिकेत भायेकर

सुख-दु:खात मदतअशोकराव चव्हाण हे नांदेडचे नेतृत्व आहेत़ आजपर्यंत कितीही संकटे आली तरी, नांदेडकरांचे प्रेम त्यांना मिळाले आहे़ प्रत्येक सुख-दु:खात अशोकरावांकडेच धाव घ्यावी लागते़ व्यापाºयांच्या पाठीशीही ते खंबीरपणे उभे राहतात़ त्यामुळे इतर कुणाकडे मदतीसाठी जाण्याची वेळच कधी आमच्यावर आली नाही़ चव्हाण यांना व्यापा-यांच्या समस्यांची जाण असून ते नेहमी आस्थेवाईकपणे आमच्याकडे त्याबाबत विचारणा करतात़ -हरिष लालवाणी

नेहमीच केले सहकार्यचव्हाण कुटुंबियामुळे नांदेडला कधी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली नाही़ त्यामुळेच नांदेडचा विस्तार झाला़ त्यामुळे येथील व्यापार वाढला़ शेजारील जिल्ह्यातील नागरिक खरेदीसाठी नांदेडात येतात़ व्यापाºयांना एलबीटीचा त्रास झाल्यानंतर त्यांनी फोनवरुन मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली़ त्यानंतर व्यापाºयांची या त्रासातून सुटका झाली़ आजपर्यंत इतर कोणत्याही नेत्याकडे जाण्याची आम्हाला गरजच पडली नाही़ त्यामुळे इतरांचा अनुभव नाही़ -लक्ष्मीकांत माळवतकर

विकासाची दूरदृष्टीअशोकराव चव्हाण यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे़ २००८ मध्ये गुरु-त्ता-गद्दी सोहळ्यासाठी नांदेडात देश-विदेशातून लाखो भाविक आले़ त्यासाठी हजारो कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता़ त्या निधीतून शहराचा चेहरामोहरा बदलण्यात आला़ आतापर्यंत जिल्ह्यात अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत़ शहरात विमानतळ उभारले, मोठ-मोठ्या पुलांची उभारणी केली़ आरटीओ कार्यालय सुरु केले़ -सुखविंदरसिंघ हुंदल

चव्हाण कुटुंबाचे योगदानदिवंगत शंकरराव चव्हाण यांच्यापासून ते आता अशोक चव्हाण यांच्यापर्यंत चव्हाण कुटुंबियांनी नेहमीच नांदेडच्या विकासासाठी योगदान दिले आहे़ कोणत्याही संकटात समोर येणारे पहिले नाव हे चव्हाणांचे असते़ विद्यमान सरकारने जीएसटी लावून आमचे मोठे नुकसान केले आहे़ किरकोळ मार्जीनवर आम्हाला व्यवसाय करावा लागत आहे़ दिल्लीत आणि राज्यात व्यापाºयांच्या प्रश्नांवर अशोकराव चव्हाण यांच्यासारखा नेताच बोलू शकतो़ -रवींद्र पंडलवार

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडcongressकाँग्रेसAshok Chavanअशोक चव्हाण