लोकमान्य टिळक जयंती
नांदेड, भारतीय राष्ट्रवादाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त यशवंत महाविद्यालयात लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी प्र.कुलगुरू तथा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे, प्रा.डॉ.एम.एम.व्ही.बेग, प्रा. डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रा. डॉ. अशोक हेंबाडे, प्रा. डॉ. संभाजी वर्ताळे, प्रा. डॉ. शिवराज शिरसाट, पी. जे. पांचाळ आदींची उपस्थिती होती.
‘स्वारातीम’ विद्यापीठात जयंती साजरी
नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या स्वागत कक्षामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, कुलसचिव डॉ. सर्जेराव शिंदे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. दीपक बचेवार, वित्त व लेखाधिकारी डॉ. डी.एम. खंदारे, उप वित्त व लेखाधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, उपकुलसचिव डॉ. श्रीकांत अंधारे, हुशारसिंग साबळे, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, सुधाकर शिंदे, शिवाजी चांदणे, हरीश पाटील, संतोष हंबर्डे, रामदास खोकले, शिवाजी हंबर्डे, तुकाराम हंबर्डे उपस्थित होते.
कविसंमेलनाचे आयोजन
नांदेड - येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त २४ जुलै रोजी भोकर तालुक्यातील मातूळ येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सकाळी अकरा वाजता कविसंमेलन, व्याख्यान व विधान चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक माधवराव पाटील मातूळकर तर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब पाटील रावणगावकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उद्योगरत्न मारोतराव कवळे गुरुजी, भोकर पंचायत समितीच्या सभापती नीता रावलोड, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव देवसरकर, मातूळचे उपसरपंच माधव बोईनवाड, स्वागताध्यक्ष सरपंच सविता कदम यांची उपस्थिती राहणार आहे.
देवसरकर यांनी घेतली कृषिमंत्र्यांची भेट
नांदेड, मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात संततधार पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी शुक्रवारी मुंबई येथे मंत्रालयात भेटून केली आहे.