लेंडी धरणाचे काम माझ्याच हातून होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:23 AM2019-04-11T00:23:59+5:302019-04-11T00:25:38+5:30
पाच वर्षे राज्यात तसेच केंद्रात विरोधकांची सत्ता होती़ आमदार भाजपचा, सरकार भाजपचे तरीही मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प ‘जैसे थे’ आहे़ हे धरण माझ्यासाठी जिव्हाळ्याचे आहे़ कै़शंकरराव चव्हाण यांनी भूमिपूजन केलेल्या या धरणाचे काम मीच पूर्ण करणार असा शब्द खा़अशोकराव चव्हाण यांनी दिला़
नांदेड : पाच वर्षे राज्यात तसेच केंद्रात विरोधकांची सत्ता होती़ आमदार भाजपचा, सरकार भाजपचे तरीही मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प ‘जैसे थे’ आहे़ हे धरण माझ्यासाठी जिव्हाळ्याचे आहे़ कै़शंकरराव चव्हाण यांनी भूमिपूजन केलेल्या या धरणाचे काम मीच पूर्ण करणार असा शब्द खा़अशोकराव चव्हाण यांनी दिला़
मुखेड तालुक्यातील येवती, बाºहाळी तसेच मुक्रमाबाद येथे खा़ चव्हाण यांच्या बुधवारी झंझावती सभा झाल्या़ या सभेत ते बोलत होते़ मंचावर आ़ रामहरी रुपनर, माजी खा़ तुकाराम रेंगे पाटील, शेषराव चव्हाण, भाऊसाहेब मंडलापूरकर, मंगाराणी अंबुलगेकर, व्यंकट पाटील दापकेकर, वैशाली चव्हाण, संजय रावणगावकर आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ खा़ चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली़
भाजपा सरकार दुटप्पी आहे़ हे सरकार धनाढ्य लोकांची खुशामत करते़ तर शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांना वेगळा न्याय देते़ अशा सरकारला आता सर्व अठरापगड जातीच्या बांधवांनी एकत्रित येवून धडा शिकवायला हवा असे ते म्हणाले़
भाजपाची कारकीर्द सपशेल अपयशी ठरलेली आहे़ त्यामुळे मतदार पुन्हा भाजपाला मते देणार नाहीत, याची जाणीव असल्यानेच वंचित बहुजन आघाडीला उभे करुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन करण्याचा डाव भाजपाने आखला आहे़ भाजपाचे हे मनसुबे ओळखून नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले़
भाजपाकडून धनगर समाजाची फसवणूक -रामहरी रुपनर
यावेळी आ़रामहरी रुपनर यांचेही भाषण झाले़ भाजपा सरकारने राज्यातील धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचे सांगत मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न करीत राज्यात काँग्रेस सत्तेत आल्याशिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही़ त्यामुळे भाजपाच्या प्रचाराला आणि आश्वासनाला भूलू नका, असे आवाहनही रुपनर यांनी यावेळी केले. बुधवारी मुखेड तालुक्यात झालेल्या तीनही सभांना मतदारांची मोठी उपस्थिती होती़