शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

लेंडी धरणाचे काम माझ्याच हातून होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:23 AM

पाच वर्षे राज्यात तसेच केंद्रात विरोधकांची सत्ता होती़ आमदार भाजपचा, सरकार भाजपचे तरीही मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प ‘जैसे थे’ आहे़ हे धरण माझ्यासाठी जिव्हाळ्याचे आहे़ कै़शंकरराव चव्हाण यांनी भूमिपूजन केलेल्या या धरणाचे काम मीच पूर्ण करणार असा शब्द खा़अशोकराव चव्हाण यांनी दिला़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण यांचा विश्वास मुखेड तालुक्यात सभांना प्रतिसाद

नांदेड : पाच वर्षे राज्यात तसेच केंद्रात विरोधकांची सत्ता होती़ आमदार भाजपचा, सरकार भाजपचे तरीही मुखेड तालुक्यातील लेंडी प्रकल्प ‘जैसे थे’ आहे़ हे धरण माझ्यासाठी जिव्हाळ्याचे आहे़ कै़शंकरराव चव्हाण यांनी भूमिपूजन केलेल्या या धरणाचे काम मीच पूर्ण करणार असा शब्द खा़अशोकराव चव्हाण यांनी दिला़मुखेड तालुक्यातील येवती, बाºहाळी तसेच मुक्रमाबाद येथे खा़ चव्हाण यांच्या बुधवारी झंझावती सभा झाल्या़ या सभेत ते बोलत होते़ मंचावर आ़ रामहरी रुपनर, माजी खा़ तुकाराम रेंगे पाटील, शेषराव चव्हाण, भाऊसाहेब मंडलापूरकर, मंगाराणी अंबुलगेकर, व्यंकट पाटील दापकेकर, वैशाली चव्हाण, संजय रावणगावकर आदींसह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती़ खा़ चव्हाण यांनी आपल्या भाषणात भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली़भाजपा सरकार दुटप्पी आहे़ हे सरकार धनाढ्य लोकांची खुशामत करते़ तर शेतकऱ्यांसह कष्टकऱ्यांना वेगळा न्याय देते़ अशा सरकारला आता सर्व अठरापगड जातीच्या बांधवांनी एकत्रित येवून धडा शिकवायला हवा असे ते म्हणाले़भाजपाची कारकीर्द सपशेल अपयशी ठरलेली आहे़ त्यामुळे मतदार पुन्हा भाजपाला मते देणार नाहीत, याची जाणीव असल्यानेच वंचित बहुजन आघाडीला उभे करुन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांचे विभाजन करण्याचा डाव भाजपाने आखला आहे़ भाजपाचे हे मनसुबे ओळखून नागरिकांनी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे रहावे, असे आवाहन त्यांनी केले़भाजपाकडून धनगर समाजाची फसवणूक -रामहरी रुपनरयावेळी आ़रामहरी रुपनर यांचेही भाषण झाले़ भाजपा सरकारने राज्यातील धनगर समाजाचा विश्वासघात केल्याचे सांगत मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देण्यात आले होते़ या आश्वासनाचे काय झाले? असा प्रश्न करीत राज्यात काँग्रेस सत्तेत आल्याशिवाय धनगर समाजाला आरक्षण मिळणार नाही़ त्यामुळे भाजपाच्या प्रचाराला आणि आश्वासनाला भूलू नका, असे आवाहनही रुपनर यांनी यावेळी केले. बुधवारी मुखेड तालुक्यात झालेल्या तीनही सभांना मतदारांची मोठी उपस्थिती होती़

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडAshok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा