सदरील रक्तदान शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, प्रा. डी.बी. जांभरुणकर, माजी विरोधी पक्षनेते जीवन पाटील घोगरे, युवक प्रदेश सचिव बाळासाहेब भोसीकर, साहेबराव कोलंबीकर, चक्रधर कलने आदींची प्रमुख उपस्थिती होती.
कोविड-१९ या जागतिक महामारीची दुसरी लाट संपूर्ण राज्यात पसरलेली आहे, दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून परिस्थिती अत्यंत चिंताजनक झाली आहे. राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा पडला असल्या कारणाने रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांनी केले. या रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी नांदेड ब्लड बॅंकेचे कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मनोज पाटील मोरे, ओमप्रकाश पाटील, नागनाथ नागरगोजे, राजेश लहानकर, गजानन देशमुख, कमलकिशोर पावडे, उत्कर्ष भोसीकर, शिवचरण ठाकूर, प्रशांत लोहाळे, शिवा भायेगावकर, शंकरसिंग ठाकूर, कोमल बसवंते, शेख इरफान, धनंजय उमरीकर, साई मुदीराज आदींनी सहकार्य केले.