निमित्त हाेते मनाेज अशाेक दमाले या अनुकंपाधारकाच्या याचिकेवरील सुनावणीचे. मनाेजचे वडील नाशिक जलसंपदा विभागांतर्गत वर्ग-३ पदावर नाेकरीला असताना त्यांचे निधन झाले. त्यानंतर त्याच्या आईने अनुकंपा नाेकरीसाठी अर्ज केला. वय वाढत असल्याने मनाेजला अनुकंपा यादीत सामावून घेण्याची विनंती केली. मात्र त्या वेळी मनाेज दहावी पास असल्याने त्याला वर्ग-४ पदावर नाेकरी देण्याची तयारी दर्शविली. प्रत्यक्षात वर्ग-३ पदासाठी लागणारी बारावी ही शैक्षणिक पात्रता, टायपिंग त्याने ग्रहण केली हाेती. मात्र ती न दिली गेल्याने त्याने ॲड. गाैरव अरविंद बांदिवडेकर यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली.
सुषमा घाेसेन प्रकरण लागू
अखेर मॅटने सर्वाेच्च न्यायालयातील सुषमा घाेसेन प्रकरणाचा न्यायनिवाडा येथे लागू करीत मनाेजला वर्ग-३ पदावर दाेन महिन्यांत नियुक्त करण्याचे आदेश १७ ऑगस्ट रोजी जारी केले. या प्रकरणात शासनाच्या वतीने सादरकर्ता अधिकारी ए.जे. चाैगुले यांनी काम पाहिले. याचिकाकर्त्याच्या वतीने ॲड. भूषण बांदिवडेकर व ॲड. गायत्री गाैरव बांदिवडेकर यांनी सहकार्य केले.
चाैकट....
अधिसंख्य पदे निर्माण करा
अनुकंपाधारकांची प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित ठेवणे, त्यांना प्रतीक्षा करायला लावणे याेग्य नाही. त्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांना सामावून घेणे गरजेचे असल्याचेही मॅटने सांगितले.
चाैकट....
१६ हजार उमेदवार प्रतीक्षेत
आजच्या घडीला राज्यात शासनाच्या विविध विभागांत आणि प्रत्येकच जिल्ह्यात एकूण सुमारे १६ हजार उमेदवार अनुकंपा नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. यातील अर्ध्याअधिक जागा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आहेत. प्रतीक्षेतील उमेदवारांच्या दृष्टीने ‘मॅट’चे हे निरीक्षण आणि निर्णय महत्त्वपूर्ण मानला जातोय.