शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

गावगुंडांच्या विषारी विळख्याने खिळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 11:33 PM

गण-गवळण, वगनाट्य, बतावणी अशा लोकनाट्यातून प्रेक्षकांना खळखळून हसवित स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गावगुंडांच्या विषारी विळख्याने नांदेडकरांची मने जिंकली़

ठळक मुद्देराज्य हौशी नाट्यस्पर्धा लोकनाट्यातून दिला स्वच्छतेचा संदेश

नांदेड : गण-गवळण, वगनाट्य, बतावणी अशा लोकनाट्यातून प्रेक्षकांना खळखळून हसवित स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या गावगुंडांच्या विषारी विळख्याने नांदेडकरांची मने जिंकली़महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नांदेड केंद्रावर आठव्या दिवशी रसिक प्रेक्षकांना लोकनाट्य प्रकाराचा आस्वाद घेता आला़ निपॉन सोशल वेलफेअर सोसायटी (बोरी जि. उस्मानाबाद) या संस्थेने सादर केलेल्या पूजा राठोड लिखित, अभय राठोड दिग्दर्शित ‘गावगुंडांचा विषारी विळखा’ या नाट्यप्रयोगाने प्रेक्षकांना खळखळून हसविले़कसलेही तामझाम नसलेल्या या नाटकाने फक्त आपल्या सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. गण-गवळण, बतावणी आणि वगनाट्य अशाप्रकारच्या सादरीकरणातून त्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला़ त्याचबरोबर समाजातील अनेक अनिष्ट प्रथांवर नाटकातून आसूड ओढले़ या नाटकाचा आशय आणि नाटकाचे नाव यात कसलेही साम्य दिसून येत नाही.स्पर्धेची सात वाजताची वेळ असताना तब्बल एक तास उशिराने हे नाटक सुरू झाले़ त्यानंतरही रसिक सभागृहात बसून होते़ नांदेडकर रसिक प्रेक्षकांचे कलावंतांप्रति प्रेम आणि त्यांची रसिकता ख-या अर्थाने यावेळी दिसून आली. त्यांचे हे प्रेम पाहून कलावंतही भारावून गेले.या लोकनाट्यात विष्णू सूर्यवंशी, विकास माने, बालाजी माने, मनोज महाजन, ईश्वर इंगोले, प्रभाकरराव आगलावे, बाळू कतुरे, तानाजी वाघमारे, सुदर्शन बनसोडे, व्यंकटेश संदले, आकाश इंगोले, अमोल पाटील, अमर काळे, सोनू साखरे, शिवाजी शिंदे या कालावंतांचा समावेश होता. २६ नोव्हेंबर रोजी प्रबोधन सेवाभावी संस्था, परभणीच्या वतीने उदय कात्नेश्वरकर लिखित, अनुजा डावरे दिग्दर्शित ‘रात्र माणसाळलेली’ या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे.

टॅग्स :NandedनांदेडTheatreनाटक