नांदेड :विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये सेवक नसल्याच्या कारणावरुन डॉक्टरने थेट टाळे ठोकत काढता पाय घेतला़ त्यामुळे सोनोग्राफीच्या तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची प्रचंड गैरसोय झाली़ शासकीय रुग्णालयात आजघडीला २४६ सेवक असून एका सेवकाकडे दोन ते तीन कक्षांची जबाबदारी देण्यात आली आहे़डॉ़शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नांदेडसह परभणी, हिंगोली, यवतमाळ व शेजारील आंध्रातून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण येतात़ त्यामुळे रुग्णालयावर दिवसेंदिवस ताण वाढतच चालला आहे़ रुग्णालयाचे शहरातून विष्णूपुरी येथे स्थलांतरण झाल्यानंतर पसारा वाढला आहे़ परंतु त्या तुलनेत या ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली नाही़ आहे त्याच कर्मचाºयांवर अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली आहे़प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या २४६ सेवकांपैकी अनेकजण केवळ हजेरीसाठीच रुग्णालयात येतात़ त्यामुळे अगोदरच कमी कर्मचारी संख्या असताना उपलब्ध असलेल्या कर्मचाºयांवर ताण पडतो़ या कर्मचाºयांकडे तीन-तीन कक्षांची जबाबदारी देण्यात येते़ अनेक कक्षात तर कर्मचारीच राहत नाहीत़ असाच प्रकार सोनोग्राफी सेंटरच्या बाबतीत झाला़ सोनोग्राफी सेंटरमध्ये सेवक नसल्यामुळे वैतागलेल्या डॉक्टरांनी कक्षालाच टाळे ठोकले़ यावेळी कक्षाबाहेर २५ हून अधिक रुग्ण सोनोग्राफीच्या तपासणीसाठी प्रतीक्षेत होते़ मात्र या रुग्णांना आल्यापावली परत जावे लागले़ यामध्ये प्रसूतीसाठी आलेल्या महिलांचाही समावेश होता़दरम्यान, रुग्णालयात सेवकांची संख्या अपुरी असून उपलब्ध सेवकांकडून काम करुन घेण्यात येत आहे़ सोनोग्राफी सेंटर बंद असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होवू नये यासाठी संबधित डॉक्टरला विचारणा करण्यात आली असून त्या ठिकाणी सेवक उपलब्ध करुन देण्यात आला, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ वाय़ एच़ चव्हाण यांनी दिली़किरकोळ कारणासाठी विभागच बंदशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात किरकोळ कारणासाठी सोनोग्राफी, सिटीस्कॅन, पॅथॉलॉजी लॅब हे विभाग बंद ठेवण्याचे प्रकार वाढले आहेत़ विभाग बंद ठेवण्यासाठी या ठिकाणी कार्यरत डॉक्टर अन् कर्मचारी कारणांच्याच शोधात असल्याचे दिसून येते़ पॅथॉलॉजी लॅबला टाळे लावण्यात आले होते़ त्यामुळे रुग्णांना किरकोळ तपासण्याही बाहेरुन कराव्या लागत होत्या़ औषधींचाही रुग्णालयात तुटवडा असून रुग्णांना बरीचशी औषधी खाजगी औषधी दुकानातून खरेदी करावी लागत आहेत़ या सर्व प्रकारामुळे गरीब रुग्णांची मात्र हेळसांड होत आहे़
सेवकाची दांडी अन् सोनोग्राफीला टाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:50 AM
विष्णूपुरी येथील डॉ़ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमध्ये सेवक नसल्याच्या कारणावरुन डॉक्टरने थेट टाळे ठोकत काढता पाय घेतला़
ठळक मुद्देशासकीय रुग्णालय : रुग्ण आल्यापावली परतले