चौकट........
...तर लक्षणे आढळल्यास प्रवाशी थेट रुग्णालयात
शहरांतर्गत तसेच जिल्हाअंतर्गत प्रवाशी बसेससाठी दोन थांबे मर्यादित ठेवण्यास सांगण्यात आले आहेत. बस थांब्यावर ज्या ठिकाणी प्रवाशी उतरतील त्यावेळी त्यांच्या हातावर १४ दिवासांच्या विलगीकरणाचा शिक्का मारण्यास सांगण्यात आले आहे. हा शिक्का बससेवा पुरविणाऱ्यानेच मारणे बंधनकारक आहे.याबरोबरच या ठिकाणी थर्मल स्कॅनरचा वापर करण्यास सांगण्यात आले असून लक्षणे असणाऱ्या प्रवाशांची थेट कोविड सेंटर किंवा रुग्णालयात रवानगी होणार आहे. या नियमाचा भंग केल्यास दहा हजारांचा दंड ठोठावण्यात येईल.
सार्वजनिक वाहनांना ५० टक्केची मर्यादा...
राज्य सरकार किंवा स्थानिक प्रशासनाच्या बसेसला ५० टक्के आसन क्षमतेने प्रवाश वाहतूक करण्यास परवानगी आहे. मात्र कोणीही उभ्याने प्रवास करणार नाही. या वाहनातूनही उतरल्यावर प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांच्या गृहविलगीकरणाचे शिक्के मारण्यात येतील. तर आंतरजिल्हा प्रवाश करणाऱ्या प्रवाशांच्या हातावर रेल्वे प्रशासन तसेच राज्य परिवहन महामंडळ क्वारंटाईनचा शिक्का मारतील. थर्मल स्कॅनरमध्ये लक्षणे दिसल्यास या प्रवाशांनाही कोविड सेंटर किंवा रुग्णालयामध्ये पाठविले जाईल.