नांदेड : लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा देण्याची लेखी ग्वाही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांनी दिली़ त्यानंतर लिंगायत समन्वय समितीने राज्यभरात काँग्रेसच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला असून त्याची घोषणा गुरुवारी नांदेड येथे पत्रकार परिषदेत करण्यात आली़
या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा़अशोकराव चव्हाण यांच्यासह लिंगायत समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर, राज्य समन्वयक माधवराव पाटील टाकळीकर, प्रदीप बुरांडे, विजयकुमार दत्तुरे, आनंद कर्णे, राजेश विभुते यांच्यासह लिंगायत समाजातील अनेकांची उपस्थिती होती़ लिंगायत धर्माला संविधानिक मान्यता व राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ यासह इतर राज्यात लिंगायत समाजाच्या वतीने अनेक मोर्चे काढण्यात आले होते
या मागणीला प्रतिसाद देत कर्नाटक राज्य काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारने लिंगायत धर्माचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून केंद्र सरकारला संविधानिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठवला़ तसेच राज्यात अल्पसंख्यांक दर्जा लागू केला़ परंतु केंद्रातील भाजपा सरकारने लिंगायत समाजाच्या मागण्यांबाबत अभ्यास न करता तो अहवाल फेटाळून लावला़ कर्नाटक राज्याच्या धर्तीवर लिंगायत स्वतंत्र मान्यतेचा प्रस्ताव केंद्रात पाठवून राज्यात लिंगायतांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचे लेखी आश्वासन प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी दिले आहे़ त्यामुळे लिंगायत समाजाने संपूर्ण ताकदीनिशी राज्यात काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे़ अशी भूमिका लिंगायत समन्वय समितीने स्पष्ट केली़
यावेळी हरीहरराव भोसीकर, बालाजी पांडागळे, माजी सभापती किशोर स्वामी, प्रवक्ता संतोष पांडागळे, नगरसेवक राजू काळे, केशवअप्पा खिचडे, नामदेव पटणे, विनोद कांचनगिरे, प्रा़रविकांत काळे, प्रा़माधव मोरे, पिंटूअप्पा बोंबले, शंकरस्वामी शेवडीकर, दिलीप डांगे, सचिन टाले, रत्नाकर कुºहाडे, संदीप विश्वासराव, मनोज लंगडे, विश्वनाथ दासे, वीरभद्र विभुते, धनंजय घोडके, किशोर बारसे आदींची उपस्थिती होती़
महापुरुषांच्या स्मारकावरून भाजपाचे राजकारण देशात महापुरुषांच्या राष्ट्रीय स्मारकांचे भाजपा सरकार राजकारण करीत आहे़ एकाही महापुरुषाच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम या सरकारच्या मागील साडेचार वर्षाच्या कार्यकाळात पूर्ण झाले नाही़ त्यामुळे अशा विश्वासघातकी सरकारच्या विरोधात आंदोलने सुरू आहेत़ नांदेड शहरात उभारण्यात येत असलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून लिंगायत समाज एकजुटीने काँग्रेसच्या पाठीशी असल्याचेही अशोकराव चव्हाण यावेळी म्हणाले.