शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये ३४ हजार मतदार वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2019 1:59 PM

हे वाढीव मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

- अनुराग पोवळे 

नांदेड :  नांदेड लोकसभेचा खासदार १७ लाख १७ हजार ८२५ मतदार ठरविणार असून, ३१ जानेवारी २०१९ नंतर झालेल्या नोंदणीत एकूण ३४ हजार ५९६ मतदारांची वाढ होणार आहे. हे वाढीव मतदार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.

नांदेड जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या २५ लाख २६ हजार ३०३ इतकी राहणार आहे. हीच मतदारसंख्या ३१ जानेवारी २०१९ अखेर २५ लाख २ हजार ४४ इतकी होती. मतदानाच्या तारखेपर्यंत २५ लाख २६ हजार ३०३ मतदार राहणार आहेत. नांदेड लोकसभेसाठी भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघातील मतदार मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत. जिल्ह्यातील किनवट आणि हदगाव मतदारसंघातील मतदार हे हिंगोली लोकसभेसाठी तर लोहा विधानसभा मतदारसंघातील २ लाख ७१ हजार ९१७ मतदार लातूर लोकसभेसाठी मतदान करणार आहेत. 

भारत निवडणूक आयोगाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत नावनोंदणी करण्यासाठी मतदारांना संधी दिली होती. या संधीचा नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदारांनी पुरेपूर लाभ उचलल्याचे स्पष्ट होत आहे. ३१ जानेवारी २०१९ अखेर नांदेड लोकसभा मतदारसंघात १७ लाख ९११ मतदारांची संख्या होती. ही संख्या १८ एप्रिलपर्यंत १७ लाख १७ हजार ८२५ पर्यंत पोहोचणार आहे. 

आज शेवटचा दिवसनांदेड लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार नांदेड उत्तर मतदारसंघात आहे. या मतदारसंघात ३ लाख ८ हजार ९७ मतदार आहेत. त्या खालोखाल देगलूर मतदारसंघात २ लाख ८९ हजार ९०४ मतदार आहेत. नायगाव मतदारसंघात २ लाख ८२ हजार ८९८, नांदेड दक्षिण मतदारसंघात २ लाख ८१ हजार २३२ आणि भोकर विधानसभा मतदारसंघात २ लाख ७६ हजार ९१४ मतदार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडVotingमतदानMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019