शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

Lok Sabha Election 2019 : नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी ठरणार निर्णायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 2:44 PM

नांदेड लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण, भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे प्रा़डॉ़यशपाल भिंगे असा सामना आहे़ मतदारसंघात दलित-मुस्लिम मते लक्षवेधी असल्याने या निवडणुकीत वंचित आघाडीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे़ 

- विशाल सोनटक्के 

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिलेले आहे़ १९५१ ते २००४ या कालावधीत झालेल्या १५ लोकसभा निवडणुकांपैकी तब्बल १२  निवडणुकांत येथे काँग्रेसचा झेंडा फडकलेला आहे़, तर केवळ तीन वेळा या मतदारसंघाने काँग्रेस विरोधकांना संधी दिली आहे़ १९७७ मध्ये शेकापच्या तिकीटावर भाई केशव धोंडगे विजयी झाले होते़ त्यानंतर १९८९ मध्ये डॉ़व्यंकटेश  काब्दे यांच्या माध्यमातून या मतदारसंघात जनता दलाला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती आणि २००४ मध्ये भाजपाच्या वतीने डी़बी़ पाटील यांनी या मतदारसंघात विजय मिळविला होता़ 

नांदेड लोकसभा मतदारसंघात सुमारे अडीच लाख मुस्लिम मते असून सव्वादोन लाख दलित मते आहेत़ तर दीड लाखाच्या आसपास धनगर-हटकर समाजाची मते आहेत़ त्यामुळेच १९८७ मध्ये खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी नांदेड लोकसभेची निवडणूक लढविली होती़ त्यावेळी काँग्रेसच्या वतीने लढत असलेल्या अशोक चव्हाण यांना २ लाख ८३ हजार १९ तर प्रकाश आंबेडकर यांना १ लाख ७१ हजार ९०१ अशी मते मिळाली होती़ त्यानंतर जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते हरीभाऊ शेळके यांनी १९९६ च्या निवडणुकीत रिपाइंच्या तिकीटावर १ लाख १९ हजार ६०६ मते खेचली होती़ 

या निवडणुकीत काँगे्रसचे गंगाधरराव कुंटूरकर विजयी झाले होते़ कुंटूरकर यांना २९़४१ टक्के तर रिपाइंच्या वतीने लढलेल्या शेळके यांना १८़९९ टक्के इतकी मते मिळाली होती़ शेळके यांचेच भाच्चे प्रा़डॉ़यशपाल भिंगे यांना आता वंचित बहुजन आघाडीने रिंगणात उतरविले आहे़ आघाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या पहिल्या सभेलाही नांदेडमध्ये मोठा प्रतिसाद मिळाल्याने ही आघाडी किती मते खेचते यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे़

सक्षम प्रचार यंत्रणेचा अभाव नांदेड लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहेत. एक भाजपकडे तर दोन मतदारसंघात शिवसेना प्रतिनिधित्व करीत आहे़ मात्र मागील विधानसभा निवडणुकीत नांदेड शहरातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही जागांवर एमआयएमने चुरशीची लढत दिली होती़ त्यामुळेच वंचित आघाडीने यावेळी नांदेडवर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे दिसते़ काँग्रेस आणि भाजपाच्या तुलनेत आघाडीकडे सक्षम प्रचारयंत्रणा नाही़ त्यामुळेच वंचित आघाडी या निवडणुकीत कुठपर्यंत मजल मारते यावरच मतदारसंघाचा निकाल अवलंबून असेल़ 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019