आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. 'देशात इंडिया आघाडीला लोकांनी नाकारले आहे, मतदाता मत द्यायला जातात तेव्हा बोलतात की , या इंडिया आघाडीवाल्यांकडे चेहराच नाही. एवढा मोठा देश आम्ही कोणाकडे द्यायचा. इंडिया आघाडीवाल्यांना हे सांगताच येत नाही. या लोकांनी दावे काहीही केले तरी त्यांनी निवडणुकीआधीच हार मानली आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर केली.
"काही नेते सारखे लोकसभेत निवडणून येत होते यावेळी आपण बघितलं ती लोक आता लोकसभा निवडणूक सोडून राज्यसभेत आले आहेत, त्यांच्याकडे निवडणूक लढण्याची हिंमत नाही. इंडिया आघाडी वाल्यांकडे आता उमेदवारही नाही हीच अवस्था आहे. त्यांचे नेते आता प्रचारही करायला जात नाही. काही ठिकाणी इंडिया आघाडीतील नेतेच एकमेकांविरोधात निवडणूक लढत आहेत. एकमेकांविरोधात आरोपही करत आहेत, अशा लोकांवर देश विश्वास ठेवू शकतो का?, असा टोलाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनाही आता वायनाडमध्ये संकट दिसत आहे. वायनाडमधील निवडणूक झाल्यानंतर काँग्रेसवाले त्यांना देशातील आणखी एका सुरक्षित ठिकाणी उमेदवारी जाहीर करतील आणि पुन्हा त्यांवा लढवायला पाहिजे, कारण इंडिया आघाडीतील त्यांचेच सहकारी त्यांच्यावर टीका करत आहेत, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
"काँग्रेसचा परिवार या निवडणुकीत काँग्रेसला मतदान नाही करणार कारण तिथे ते राहतात तिथे काँग्रेसचा उमेदवारच नाही. हे असं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झाले आहे. चार जून नंतर इंडिया आघाडीतील नेते एकमेकांविरोधात असणार आहेत, असंही पीएम मोदी म्हणाले.