नांदेड : लोकमत सखीमंचतर्फे कुलू-मनाली-चंदिगड सहल २६ मे ते १ जून २०१९ दरम्यान आयोजित केली आहे़लोकमत सखीमंच सदस्यांसाठी तसेच त्यांच्या मैत्रिणींसाठी समर स्पेशल टूर आयोजित केली आहे़ या सहलीमध्ये चंदिगड येथे मुक्काम तसेच चंदिगडमध्ये रॉक गार्डन, सुखणा लेक, त्यानंतर कुलू येथे शॉल कारखाने भेट, येथे मनसोक्त शॉपिंग करू शकता़ मनाली येथे स्रो पॉर्इंट, हडीम्बा टेम्पल, शॉपिंग, रोज गार्डन, चंदिगड अशा अनेक ठिकाणी सहलीदरम्यान भेट देण्यात येणार आहे़सहलीचा प्रवास नांदेड ते हैदराबाद ट्रेन, त्यानंतर हैदराबाद ते दिल्ली विमानाने प्रवास, नंतर ट्रॅव्हल्सने प्रवास असेल़ तसेच राहण्याची व्यवस्था ३ स्टार हॉटेलमध्ये करण्यात आली आहे़ परतीचा प्रवास हा दिल्ली ते हैदराबाद विमानाने आणि हैदराबाद ते नांदेड ट्रेनने असेल़ ही सहल पूर्ण सहा दिवसांची असून यामध्ये सखीमंच सदस्यांसाठी २३ हजार तसेच इतर महिलांसाठी २४ हजार शुल्क आकारले आहे़ कार्यक्रमाचे प्रायोजक एक्सप्लोरा टूर हे आहेत. नावनोंदणीसाठी आधार कार्डची झेरॉक्स सोबत आणणे अनिवार्य आहे़ नोंदणीची शेवटची तारीख १० एप्रिल २०१९ असून नोंदणी लोकमत कार्यालय, पहिला मजला, बालाजी टॉवर, व्हीआयपी रोड, नांदेड येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत करावी़ अधिक माहितीसाठी ८६६८५१४१३३ या क्रमांकावर संपर्क करावा़
लोकमत सखींची स्पेशल समर सहल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2019 12:02 AM