लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील वसंतनगर भागातील व्यापारी संतोष सुधाकरराव मुखेडकर यांनी व्याजाच्या पैशासाठी सावकारांकडून होणाºया त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. आत्महत्येपूर्वी मुखेडकर यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावे चिठ्ठी लिहून पैशासाठी त्रास देणाºया मंडळींवर कारवाई करण्याचे नमूद केले आहे.वसंतनगर येथील संतोष मुखेडकर यांचा धनेगाव येथे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांनी तीन लोकांकडून जवळपास ३३ लाख रुपये बारा वर्षांपूर्वी घेतले होते. याचे व्याज ते नियमितपणे भरत होते. आतापर्यंत मुद्दल रकमेपेक्षा दुप्पट-तिप्पट रक्कम त्यांनी व्याजाच्या रूपात दिली. परंतु, नोटाबंदीनंतर व्यवसायात नुकसान झाले. त्यामुळे व्याजाची रक्कम देण्यात दिरंगाई होत होती. त्यातच यातीलच एका सावकाराने भिशीच्या पैशाचेही मुखेडकर यांच्याकडून व्याज घेतले. त्यामुळे त्यांना दरमहा जवळपास ४० हजार व्याज द्यावे लागत होते. एप्रिल महिन्यात व्याजाची रक्कम देण्यास विलंब झाल्याने सावकारांनी मुखेडकरांना शिवीगाळ केली. तसेच सतत तगादा लावत होते. या त्रासाला कंटाळून रविवारी मध्यरात्री संतोष मुखेडकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.अधीक्षकांना चिठ्ठीआत्महत्येपूर्वी संतोष मुखेडकर यांनी पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांच्या नावे चिठ्ठी लिहिली आहे. त्या चिठ्ठीत तिन्ही व्यापाºयांची नावे असून, त्यांच्याकडून घेतलेल्या रकमेचा आणि व्याजाचाही उल्लेख आहे. सावकारांकडून होणाºया त्रासाला कंटाळूनच आत्महत्या करीत असल्याचे नमूद आहे. त्याचबरोबर सावकारांपासून कुटुंबाला मुक्त करावे व यातील एका सावकाराला कठोर शिक्षा करावी, असा उल्लेख आहे.
सावकारी पाश; व्यापाऱ्याचा गळफास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 12:30 AM
शहरातील वसंतनगर भागातील व्यापारी संतोष सुधाकरराव मुखेडकर यांनी व्याजाच्या पैशासाठी सावकारांकडून होणाºया त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी घडली. आत्महत्येपूर्वी मुखेडकर यांनी पोलीस अधीक्षकांच्या नावे चिठ्ठी लिहून पैशासाठी त्रास देणाºया मंडळींवर कारवाई करण्याचे नमूद केले आहे.
ठळक मुद्देनांदेडमधील घटना : चिठ्ठीत सावकारांची नावे