अरुणा शिंदे यांनी आपल्या व्याख्यानात शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र सर्व अंगांनी उलगडून सांगितले, ते कसे कर्तबगार राजे होते, ते कसे जनतेचे रक्षक होते, याविषयी विचार व्यक्त केले.
प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य आणि हे स्वराज्य सुराज्य व्हावे, ही श्रींची इच्छा होती, त्याचप्रमाणे दूरदृष्टी ठेवून छत्रपतींनी आपले सारे आयुष्य पणाला लावले. हे कार्य करत असताना अनेक कठोर परिश्रमांना त्यांनी तोंड दिले. एक कर्तृत्ववान, शौर्यवान, धैर्यवान राजा असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श प्रत्येकाने घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. संगीता घुगे यांनी केले.
यशस्वितेसाठी यशवंत प्रबोधन व्याख्यानमाला समितीतील सदस्य प्रा. गौतम दुथडे, ग्रंथपाल डॉ. कैलास वडजे, माधव भोसले यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन डॉ. कविता सोनकांबळे यांनी, तर आभार डॉ. मीरा फड यांनी मानले.