- प्रदीप कांबळे
लोहा या मतदारसंघालाजवळपास ३५ वर्षे माजी खा़ व आ. भाई केशव धोंडगे यांनी शेकापचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण करून दिली होती़ मात्र १९९५ नंतर बालेकिल्ल्याला शिवसेनेने सुरुंग लावला़ मागील निवडणुकीपासून मुक्तेश्वर धोंडगे भाजप व आता सेनेच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. तर त्यांचे परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांचे पुत्र दिलीप धोंडगे पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. खा. चिखलीकर यांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे खटाऱ्यात बसून विधानसभा गाठण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नरंगले हे बहुजन व जातीय समीकरणाच्या मुद्यावर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे़
शिवसेनेकडून मुक्तेश्वर धोंडगे निवडणूक रिंगणात आहेत़ मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी बदलले आहेत. खा. चिखलीकरांचे मेहुणे सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. मात्र त्यांनी मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवली होती. त्यांचा काँग्रेसच्या अमरनाथ राजूरकर यांनी पराभव केला होता. यावेळी त्यांनी ‘अभी नाही तो कभी नही’ चा नारा देत दंड थोपटले आहेत. प्रारंभी तिकीट वाटपावरुन शिंदे अन् चिखलीकर कुटुंबात चांगले रण पेटले होते़ तीन दिवसांपूर्वी (शिंदे) मामाच्या मदतीला भाचे प्रवीण चिखलीकर धावून आले. तर माजी आ. रोहिदास चव्हाण जावयाच्या भावाच्या मदतीसाठी काँग्रेस पक्ष सोडून सेनेत पुनश्च डेरेदाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप धोंडगे हे शिवसेनेचे उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे यांचे भाचजावई आहेत. वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा तरुण उमेदवार शिवकुमार नरंगले यांना उमेदवारी दिली. प्रमुख चार प्रबळ उमेदवारांपैकी तीन मराठा तर वंचितकडून लिंगायत उमेदवार आहे़
मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- पाण्याची सातत्याने होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी योजना अंमलात आणणे, माजलगाव कालवा काम, लेंडी, वाडी-तांडे तसेच लोहा शहराला लिंबोटी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची गरज आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आले़ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली असून दळणवळणास अडचण, ग्रामीण भागातील रस्त्यावरील पुलांच्या उंची वाढविणे, शहरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्याचा प्रश्न कायम आहे़- औद्योगिक क्षेत्र वाढवून बेरोजगारांच्या हातांना काम उपलब्ध करुन देण्याची गरज आहे़ लोहा अन् कंधार या दोन्ही तालुक्यांतून दरवर्षी कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते़ हे स्थलांतरण रोखावे लागणार आहे़ जि. प. च्या शाळांची दयनीय अवस्था आहे़ मतदारसंघातील शिक्षणाच्या दर्जाबाबतही वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात़
प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजूमुक्तेश्वर धोंडगे (शिवसेना)मुक्तेश्वर धोंडगे हे माजी आ. व खा.केशवराव धोंडगे यांचे पुत्र आहेत़ त्यांनी बाजार समिती संचालक म्हणून काम केले़ अनेक शैक्षणिक संस्था, दोनवेळा जि.प. निवडणुकीचा व एक विधानसभा निवडणुकीचा अनुभव, पत्नी जि.प.सदस्या, राजकारण व समाजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग आहे़
श्यामसुंदर शिंदे (शेकाप)श्यामसुंदर शिंदे हे चिखलीकर यांचे मेहुणे आहेत. सेवानिवृत्त सनदी अधिकारी असल्याने त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव ही जमेची बाजू आहे. मतदारसंघात त्यांच्या पत्नीचे सामाजिक क्षेत्रात कार्य, समाजाशी सलोख्याचे संबंध, चिखलीकर यांच्यासोबत घेतले जुळवूऩ
दिलीप धोंडगे (राष्ट्रवादी)दिलीप धोंडगे यांनी जि.प.उपाध्यक्ष पदी यशस्वी काम केले. तरुणांमध्ये लोकप्रिय, सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्य. वडील माजी आ.शंकर अण्णा धोंडगे यांच्या शेतकरी चळवळीतील योगदान मोठे आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून तयारी सुरु आहे़
शिवा नरंगले (वंचित आघाडी)शिवकुमार नरंगले ग्रामपंचायतचा कारभार, विविध पक्षांत व नेतेमंडळीसोबत सुसंबंध, सामाजिक, राजकीय कार्यात अग्रेसर, चळवळीत व आंदोलनप्रसंगी कार्यकर्त्यांसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख़ मतदारसंघात लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे़
2०14चे चित्रप्रताप चिखलीकर (शिवसेना) मुक्तेश्वर धोंडगे (भाजपा-पराभूत)