शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नांदेडमध्ये पाण्यातून दोनशेहून अधिक जणांना विषबाधा, ६ जण गंभीर
2
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
3
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
4
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
5
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
6
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
7
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
8
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
9
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
10
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
11
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
12
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
13
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
14
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
15
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
16
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
17
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
18
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
19
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
20
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार

महावितरणची हयगय शहराला भोवणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:50 AM

विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील विद्युत रोहित्र तात्काळ काढून घेण्याच्या मनपाच्या पत्राकडे महावितरणनने कानाडोळा केला असून महावितरणची ही हयगय शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. प्रकल्पातून असाच पाणीउपसा सुरु राहिल्यास शहरावर एप्रिलमध्येच जलसंकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देएप्रिलमध्येच नांदेडवर जलसंकटाची भीती, भरारी पथकांचीही कामगिरी शून्यच

नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पातून होत असलेला अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी प्रकल्पाच्या दोन्ही तीरावरील विद्युत रोहित्र तात्काळ काढून घेण्याच्या मनपाच्या पत्राकडे महावितरणनने कानाडोळा केला असून महावितरणची ही हयगय शहरवासियांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. प्रकल्पातून असाच पाणीउपसा सुरु राहिल्यास शहरावर एप्रिलमध्येच जलसंकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे.विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला ३७ दलघमी पाणी उपलब्ध आहे. शहराला प्रतिमहिना ३ दलघमी पाणी ुलागत असले तरी विष्णूपुरी प्रकल्पातून आजघडीला प्रतिमाह १२ दलघमी पाणीउपसा सुरु आहे. याच वेगाने पाणीउपसा सुरु राहिल्यास आगामी काळात शहराला पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.विष्णूपुरी प्रकल्पाच्या दोन्ही तिरांवरुन सुरु असलेला अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने भरारी पथकांची स्थापना केली आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता प्रकल्पातील पाणीसाठा सुरक्षित करण्याची नितांत गरज आहे. त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी विष्णूपुरी प्रकल्पातून अनधिकृत बागायतदारांकडून उचलला जाणारा पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मात्र आजघडीला या पथकांची कामगिरी अशीतशीच आहे.या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त लहुराज माळी यांनी महाराष्टÑ राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना १४ जानेवारी २०१९ रोजी एक पत्र लिहून अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर महाराष्ट्र पाटबंधारे विभाग अधिनियम १९७६ नुसार पंपसेट जप्त करणे, वीज तोडणे व फौजदारी स्वरुपाची तरतूद आहे. सदर तरतुदीअन्वये पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या भाग क्र. १० (९७) (१) व (२) नुसार निश्चित केली आहे. जलाशय अथवा नदीतून अवैध पाणीउपसा होत असल्यास पोलीस विभागाच्या मदतीने पंपसेट जप्त करता येतील. तसेच निर्देशित कालावधीकरिता वीजपुरवठा खंडित करता येऊ शकतो.या अधिनियमानुसार महावितरणने कारवाई करावी, असे महापालिकेने कळविले होते. मात्र १५ दिवसानंतरही महावितरणने कोणतीही कारवाई केली नाही हे विशेष! म्हणजे याच विषयात आयुक्त माळी यांनी महावितरणच्या अधिकाºयांची १७ जानेवारी रोजी बैठकही घेतली होेती. या बैठकीत पाणीप्रश्नाचे गांभीर्य संबंधितांना कळविण्यात आले होते. १५ दिवसानंतरही कारवाई न झाल्याने महावितरणने ही बाब गांभीर्याने घेतली नसल्याचेच स्पष्ट झाले आहे. याचा फटका आगामी काळात शहरवासियांना बसणार आहे. प्रकल्पात आजघडीला ३७ दलघमी पाणीसाठा असला तरीही प्रतिमाह १२ दलघमी पाणीउपसा सुरु आहे. या पाणी उपशावर नियंत्रण आणण्याची गरज आहे. विशेष म्हणजे, अवैध पाणी उपसा रोखण्यासाठी महावितरणने रोहित्र काढून घेण्याची कार्यवाही करावी, असे खुद्द जिल्हाधिकाºयांनीही सूचित केले होते. तसेच पाटबंधारे मंडळानेही महावितरणला एका पत्राद्वारे कळविले होते. असे असतानाही कार्यवाही झाली नाही. एकूणच शहराचा पाणीप्रश्न एप्रिलच्या मध्यानंतर ऐरणीवर येणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पात पाणी घेण्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने शहरासियांची चिंता आणखीच वाढणार आहे.शहरासाठी पैनगंगा प्रकल्पातूनही पाणी घेतले जात आहे. पहिल्या टप्प्यात २ दलघमी पाणी आसना नदीमध्ये घेण्यात आले होते. सांगवी बंधाºयातून हे पाणी उचलून काबरानगरातील जलशुद्धीकरण केंद्रातून उतर नांदेडातील काही भागांना उपलब्ध झालेल्या १ दलघमी पाण्यातून २० ते २५ दिवस पाणीपुरवठा केला होता. दुसºया टप्प्यात पाणी घेण्याच्या हालचाली सुरु आहेत. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय तसेच पाटबंधारे विभागाला महापालिकेने पत्र दिले आहे.१२ हजार अश्वशक्ती पंपाने पाणीउपसाविष्णूपुरी प्रकल्पात उपलब्ध असलेल्या ३७ दलघमी पाण्यातून प्रतिमाह १२ दलघमी पाणीउपसा असाच सुरु राहिल्यास तीन महिन्यांतच प्रकल्प तळाला जाणार आहे. त्याचवेळी फेब्रुवारीनंतर बाष्पीभवनाचे प्रमाण वाढणार आहे. प्रकल्पातून २३ डिसेंबर २०१८ ते २८ डिसेंबर २०१८ या कालावधीत २.८७ दलघमी पाण्याचा वापर झाला आहे. हे प्रमाण प्रतिदिन ०.५७ दलघमी इतके आहे. प्रकल्पाच्या दोन्ही तीरांवरुन शेतकºयांनी बसविलेल्या पंपाची एकत्रित अश्वशक्ती ही १२ हजार इतकी आहे. या अश्वशक्तीने पाणीउपसा सुरु असल्याचे पाटबंधारे विभागानेच स्पष्ट केले आहे. हा उपसा रोखण्याची गरज आहे.

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाईNanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिका