पिंपरी महिपाल ग्रामपंचातीच्या ९ पैकी ६ जागेवर उमेदवार जिंकून लोकसेवा बहुजन विकास पॅनलने यश प्राप्त केले होते. विशेष म्हणजे, ग्रामविकास पॅनलच्या सर्व दिग्गजांचा मतदारांनी पराभव करून लोकसेवा बहुजन विकास पॅनलच्या सर्व नवयुवक सदस्यांच्या हाती सत्ता दिली. यामध्ये पॅनलप्रमुख हनुमान चंदेल, गिरधारी जोगदंड, कपिल पोहरे, बालाजी पोहरे, राजू भिसे, रंगनाथ जोगदंड, रुक्माजी जोगदंड, उत्तम कदम, गंगाधर कदम, छत्रपती कदम, संभाजी कदम आदींनी परिश्रम घेऊन परिवर्तन घडवून आणले. सरपंचपदी विराजमान झालेल्या अलका चंदेल, उपसरपंच रमाबाई खिल्लारे, सदस्य कमलेश कदम, देवयानी गिरधारी जोगदंड, किशोर पोहरे, आरती पोहरे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनलप्रमुख हनुमान चंदेल यांनी गावाच्या विकासासाठी सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यातच नव्हे, तर मराठवाड्यात वेगळी ओळख निर्माण करणारी पिपंरी म.ग्रामपंचायत असेल, असे सांगितले.
पिंपरी म.ग्रामपंचायतीवर महिलाराज; सरपंचपदी चंदेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 4:17 AM