शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
मेल्यावरही फरफट, झोळीतून नेला देह, रस्ताच नसल्याने चार किमी पायपीट, पेणमधील विदारक चित्र
3
"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
4
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
5
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
6
"काँग्रेसकडून जाती-जातीत भांडण लावण्याचा खतरनाक खेळ, म्हणूनच 'एक है तो सेफ है"', नरेंद्र मोदी यांचा घणाघात
7
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
8
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
9
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
10
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
11
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
12
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
13
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
14
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
16
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
17
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
18
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
20
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान

नवरात्रोत्सवासाठी माहूरगड सजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:43 AM

आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थान येथे नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणी प्रथम जिल्हा न्यायाधीश सुभाष खरात यांनी दिली़

ठळक मुद्देआज घटस्थापना : दहा दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : आदिशक्तीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या माहूर येथील रेणुकादेवी संस्थान येथे नवरात्र उत्सवात दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती रेणुकादेवी संस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष आणी प्रथम जिल्हा न्यायाधीश सुभाष खरात यांनी दिली़१० आॅक्टोबर रोजी अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर सकाळी सात ते साडेअकरादरम्यान श्री रेणुकादेवीच्या वैदिक पूजेस प्रारंभ, वेदघोष, रेणुकादेवीच्या मुख्य गाभाऱ्यातील घटस्थापना होणार आहे. गडावर नवरात्रनिमित्त दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले असून या काळात लाखो भाविक रेणुका देवीच्या दर्शनासाठी येणार असल्याने प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. देवी माहात्म्यात नवरात्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या पराक्रमाचा, शौर्याचा पवित्र काळ. सतत नऊ दिवस रणचंडिकेने दृष्ट राक्षसांसोबत घनघोर युद्ध करून आपला पराक्रम दाखविला तो कालखंड. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून देवीने पराक्रम करुन विजयादशमीस विजय संपादित केला. त्याच काळाला शारदीय नवरात्र असे म्हणतात.माहूर येथे दहा दिवस नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यात दि. १० प्रतिपदा/द्वितीयापासून पंचमीपर्यंत नितीन जयसिंग धुमाळ यांचे सनईवादन सकाळी ५ ते ७ व सायंकाळी ६ ते ७ या वेळेत होणार आहे. तर प्रतिपदेलाच सायंकाळी डॉ. अविराज तायडे (नाशिक) यांचा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, तृतीया ह.भ.प प्रज्ञा देशपांडे कीर्तनकार पुणे, चतुर्थीला किराणा घराण्याचे युवक गायक रामेश्वर डांगे (पुणे),ललिता पंचमीला मुख्य कार्यक्रम प. डॉ.पराग चौधरी (औरंगाबाद), भक्ती संगीत संजय जोशी (नांदेड),विलास गरोळे व राजेश्री जोशी (नांदेड), प्रसन्न जोशी (नागपूर),आनंदी व भार्गवी विकास मालेगावकर यांचा कथ्थक नृत्याचा कार्यक्रम, सायंकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत असणार आहे.पंचमीला ऋतुराज संगीत विद्यालय, अकोलाचे जयपूरकर आणि संच, शष्ठीला अभिजित रत्नाकर आपस्तव, मालती आपस्तव यांचे गायन. सप्तमी, अष्टमीला नलिनी विनायक वरणगावकर यांचे कीर्तन, नवमीला हवन पूर्णाहुती पूजा व दसºयाला परशुराम पालखीसोहळा (सीमोल्लंघन) होणार आहे. परंपरेनुसार कोजागिरी पौर्णिमेला २३ रोजी स्नेहा भाले (औरंगाबाद), राजन डांगे (चिखली , बुलढाणा), प्रदीप कोरटकर, संजय कोरटकर (पुसद) यांचा गायनाचा कार्यक्रम होणार आहे.यासंदर्भात झालेल्या बैठकीला उपाध्यक्ष व उपविभागीय पोलीस अधिकारी आसाराम जहारवाल, सचिव व सहायक जिल्हाधिकारी शक्ती कदम, प्रभारी तहसीलदार तथा कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगावकर, विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय काण्णव, समीर भोपी, भवानीदास भोपी, श्रीपाद भोपी, विनायक फांदाडे, आशिष जोशी यांची उपस्थिती होती़

टॅग्स :NandedनांदेडNavratriनवरात्री