लोकमत न्यूज नेटवर्कश्रीक्षेत्र माहूर : शहरासह तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवत असून शहरास पाणी पुरवठा करणाºया पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट आहे, याशिवाय कोल्हापुरी बंधा-यातून पाणी उपसा करणारी पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. पुन्हा एकदा टँकर लाँबीसह फिल्टर पाणी पुरविणाºया कंत्राटदारासह दलालांना सुगीचे दिवस आले. या उलट राजकीय सर्वच पत्र मात्र तक्रारीसह हेवादाव्यात ‘मश्गुल’ असल्याने पाणी प्रश्न गंभीर रुप धारण करत आहे.शहरासह तालुक्यात नळयोजना चालविण्याइतपत पाणीसाठा असलेला एकही तलाव किंवा धरण नसल्याने बहुतांश गावांच्या नळयोजना बंद पडल्या असून गावाशेजारी असलेल्या शेतातील खासगी विहिरीवरुन पाणी आणण्याची वेळ महिलांवर आली. दरवर्षी प्रमाणे नदीवरुन पाणी पुरवठा करणारी मौजे अनमाळची नळयोजना बंद पडल्याने नागरिकांनी कामाच्या शोधात स्थलांतर सुरू केले.तालुक्यात जंगल मोठ्या प्रमाणात असून वन विभागाकडून पावसाळ्यात पानवठे तयार करण्याऐवजी उन्हाळ्यात शिकारीला प्रोत्साहन देण्यासाठी पानवठे तयार करण्यात येत आहेत. जंगलातील दºया, खोºयात मोठे बांध टाकून वर्षभर पाणी राहील, असे तलाव बांधण्यात न आल्याने जंगलात असलेले रोही, हरीन, ससे, निलगाय, डूकर आदी प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेत आहेत.रेणुकादेवी संस्थानातही पाण्याचा ठणठणाट४श्रीेक्षेत्र माहूर शहराला पाणी पुरवठा करणारी नळयोजना पैनगंगा नदीवरुन असून श्री रेणुकामाता मंदिराला पाणी पुरवठा करणारी नळयोजना येथूनच आहे. गेल्या आठ दिवसापासून नदीपात्रातील पाणी संपल्याने शहरासह संस्थानवर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली. तालुक्यातील मौजे दिगडी धा. व दिगडी कु. येथे दोन केटीवेअरचे नदीपात्रही कोरडे पडले आहे.४ आ. प्रदीप नाईक यांच्या सुचनेवरुन माहूर पं.स.चे सभापती मारोती रेकुलवार यांनी दिगडी कु. हडसनी रुई यासह अनेक गावांचे ठराव गटविकास अधिकारी यांच्या मान्यतेसह जि.प.उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यामार्फत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवून बंधाºयातील पाणी नदीपात्रात सोडण्याची विनंती केली.पाणीटंचाईवर सर्वांचेच मौन४माहूरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यांनी ठरावांच्या प्रतिसह प्रस्ताव पाठवून पाणी सोडवून घेतल्याने आजवर पाणी पुरले. आता मात्र निधी जमा न केल्याने नदी पात्रात पाणी सोडण्यात आलेले नाही. कोरड्या नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याने खड्डे पडले आहेत. शहरातील नगरपंचायतसह शहरात सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांची भरमार असून अनाठायी विषयांवर कल्ला करणाºयांची दिवसेंदिवस भर पडत चालली. काडीचाही संबंध नसलेल्या विषयांवर मरगळ आलेले पदाधिकारी मोर्चे, निवेदने देतात, पाणीटंचाई वा इतर विकास कामांवर कोणीही बोलत नसल्याने शहरासह तालुक्यातील नागरिक‘फुकटी लिडरशीप’ करणाºया, वैयक्तिक स्वार्थासाठी झगडणाºया नेत्यांना कंटाळले. जिल्हाधिकाºयांनी त्यांच्याकडे आलेल्या सर्व तक्रारींचा एकदाच निपटारा करावा, अशी मागणी होत आहे.
माहुरात टँकर माफिया सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:38 AM
शहरासह तालुक्यात भीषण पाणी टंचाई जाणवत असून शहरास पाणी पुरवठा करणाºया पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा ठणठणाट आहे, याशिवाय कोल्हापुरी बंधा-यातून पाणी उपसा करणारी पाणी पुरवठा योजना बंद पडल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. पुन्हा एकदा टँकर लाँबीसह फिल्टर पाणी पुरविणाºया कंत्राटदारासह दलालांना सुगीचे दिवस आले. या उलट राजकीय सर्वच पत्र मात्र तक्रारीसह हेवादाव्यात ‘मश्गुल’ असल्याने पाणी प्रश्न गंभीर रुप धारण करत आहे.
ठळक मुद्देपैनगंगा नदी कोरडीठाक : नागरिकांसह भाविक, प्राण्यांचे हाल; राजकीय पक्ष हेवेदाव्यात मग्न