लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शहरातील हिंगोली गेट परिसरातील गोदावरी रुग्णालयाच्या इमारतीवर मागील बाजूने खिडकीच्या स्लॅबवर चढलेल्या मनोरुग्णाने पोलीस आणि अग्निशमन विभागाची चांगलीच दमछाक केली़ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेपासून मनोरुग्णाची ही विरुगिरी सुरु होती़ त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याने उडी घेतली़ यावेळी अग्निशमन विभागाने प्रसंगावधान राखत जागेतील दगड व इतर साहित्य हटविले होते़ त्यामुळे मनोरुग्णाचा जीव वाचला़ त्यानंतर उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़हिंगोली गेट परिसरात शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास गोदावरी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर असलेल्या सुरक्षारक्षकाची नजर चुकवून विठ्ठल गणपतराव येरेवार (वय ४०, राख़डकी ता़हिमायतनगर) हे रुग्णालयात घुसले़ त्यानंतर ते थेट रुग्णालयाच्या छतावर गेले़ छतावरुन ड्रेनेजच्या पाईपने खिडकीवरील सज्जावर आले़ ही बाब सुरक्षा- रक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी येरेवार यांना खाली उतरण्यास सांगितले़ परंतु तो खाली उतरण्यास तयार नव्हता़ त्यानंतर थोड्याच वेळात घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले़ यावेळी पहाटेचे चार वाजले होते़ पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी येरेवार यांना खाली उतरविण्यासाठी बरेच प्रयत्न केले़ मात्र येरेवार उडी घेवून जीव देण्याची धमकी देत होते़ यावेळी अग्निशमनच्या जवानांनी छतावरुन दोरी टाकून त्यांना वर ओढण्याचाही प्रयत्न केला, परंतु येरेवार कशालाही प्रतिसाद देत नव्हते़ खाली होणारी गर्दी पाहून नंतर येरेवार यांनी आपल्या अंगातील शर्ट काढला़ तो शर्ट पाईपला बांधून गळफास घेण्याचाही प्रयत्न केला़ त्यामुळे पोलीस आणि अग्निशमन दलाची धांदल उडाली़ सकाळी नऊ वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता़ उडी घेतल्यास दुखापत होवू नये म्हणून अग्निशमनच्या जवानांनी इमारतीखालील दगड व इतर साहित्य तातडीने हटविले़ तोपर्यंत येरेवार हे पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या स्लॅबपर्यंत पोहोचले होते़ त्यानंतर त्यांनी स्लॅबवरुन मोकळ्या मैदानात उडी घेतली़ या ठिकाणी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी लगेच येरेवार यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ यात येरेवार यांना थोडेसे खरचटले असून गंभीर दुखापत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले़ परंतु या सर्व प्रकारात पाच तास यंत्रणेला वेठीस धरले होते़रुग्णालयातूनही पळयेरेवार यांनी स्लॅबवरुन उडी घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी विष्णूपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़ त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना ही बाब कळविण्यात आली़ कुटुंबियांनीही ते मनोरुग्ण असल्याची माहिती पोलिसांना दिली़ येरेवार यांच्या उडी घेण्यामागील कारण जाणून घेण्यासाठी पोलीस रुग्णालयात गेले असता, ते त्या ठिकाणाहूनही पळ काढल्याचे आढळून आले़ त्यामुळे पोलिसांची पुन्हा डोकेदुखी वाढली़
नांदेड शहरात मनोरुग्णाची विरुगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:19 AM
शहरातील हिंगोली गेट परिसरातील गोदावरी रुग्णालयाच्या इमारतीवर मागील बाजूने खिडकीच्या स्लॅबवर चढलेल्या मनोरुग्णाने पोलीस आणि अग्निशमन विभागाची चांगलीच दमछाक केली़ शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजेपासून मनोरुग्णाची ही विरुगिरी सुरु होती़ त्यानंतर सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याने उडी घेतली़ यावेळी अग्निशमन विभागाने प्रसंगावधान राखत जागेतील दगड व इतर साहित्य हटविले होते़ त्यामुळे मनोरुग्णाचा जीव वाचला़ त्यानंतर उपचारासाठी त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले़
ठळक मुद्देपाच तास यंत्रणा वेठीस : स्लॅबवरुन मारली उडी