लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: सकल मराठा समाजाच्या वतीने ९ आॅगस्ट क्रांतिदिनी मुंबई येथे राज्यस्तरीय मराठा क्रांती महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़ या मोर्चामध्ये समाजबांधवांनी सहभागी व्हावे याबाबत जनजागृती करण्यासाठी बुधवारी शहरातील छत्रपती चौक येथून दुचाकी रॅली काढण्यात आली़ रॅलीत हजारो तरुण-तरुणी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते़ हडको येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला़मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्यावे, स्वामीनाथन् आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाल हमीभाव द्यावा, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या प्रमुख मागण्यांसाठी ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे राज्यस्तरीय महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे़या मोर्चासंदर्भात जनजागृती करण्यासाठी बुधवारी नांदेड शहरात दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते़शिवाजीनगरमार्गे ही रॅली हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ पोहोचली़ या ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन समारोप करण्यात आला़ समारोप बैठकीत सुचिता पाटील यांनी मार्गदर्शन केले़ रॅलीत मराठा समाजातील महिला, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय मंडळी, डॉक्टर, अभियंते, वकील, बुद्धिजीवी, विद्यार्थी, तरुण-तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़
मराठा समाजाची दुचाकी रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 12:44 AM