परभणी-मनमाड दुहेरीकरण व अन्य रेल्वे प्रश्न खा. इम्तियाज जलील यांनी लोकसभेत प्रभावीपणे मांडल्याबद्दल त्यांचे परिषदेतर्फे कौतुक करण्यात आले आहे. तसेच मराठवाड्यातील खासदारांबरोबर मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी दिल्ली किंवा मुंबई येथे रेल्वेमंत्र्यांबरोबर विशेष बैठक घेण्याचे मान्य केल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. मराठवाड्यातील रेल्वेसंबंधी मागण्यांचा एक मसुदा जनता विकास परिषदेने प्रत्येक खासदाराकडे पाठविला आहे. रेल्वे अर्थसंकल्पात दुहेरीकरणाबरोबरच वर्धा-नांदेड, रोटेगाव-कोपरगाव, जालना-खामगाव, औरंगाबाद-चाळीसगाव, नांदेड-बिदर, नांदेड-लातूर रोड व इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर मागण्यांना बगल देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री मराठवाडा विभाग दक्षिण मध्य रेल्वेमधून काढून मध्य रेल्वेला लावण्यात खासदारांच्या बैठकीत सकारात्मक विचार करतील, अशी अपेक्षा परिषदेचे पदाधिकारी डॉ. काब्दे, प्रा. के.के. पाटील, प्रा. शरद अदवंत, इंजि. द.मा. रेड्डी, डॉ. अशोक सिद्धेवाड, प्रा. थोरात, प्रा. जीवन देसाई आदींनी व्यक्त केली आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात मराठवाड्याची घोर उपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:17 AM