तीन आरोपींना कारावास
कुंडलवाडी : चोरीच्या आरोपाखाली अटक केलेल्या तीन आरोपींना न्यायदंडाधिकारी व्ही.बी. साळुंके यांनी दोषी ठरवून १७ महिने कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. पांडुंगा राजन्ना (वय २६, रा. दंडीगुट्टा, जि. निजामाबाद), पुडारी गाजन्ना (वय २६, रा.दंडीगुट्टा, जि. निजामाबाद), पुडारी राजेश (वय ३०, रा. राघुपल्ली, जि. निजामाबाद), कर्णे लिंगम (वय ३२, रा. कराडपल्ली, जि. निजामाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी चोरी झालेल्या मालापैकी एकअंकी १० हजार रुपये हस्तगत करून सर्वांविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते.
घरगुती भांडणावरून मारहाण
हदगाव : घरगुती कारणावरून आरोपींनी एकाला मारहाण केल्याची घटना हदगाव तालुक्यातील वायफना येेथे घडली. तामसा पोलीस ठाण्यात या प्रकरणी किरण शिंदे यांनी तक्रार दिली असून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. सहायक पोलीस उपनिरीक्षक डुडुळे तपास करीत आहेत.
नरसी येथे बैठक
नरसी : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नरसी येथे रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या वतीने शांतता समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, चेअरमन मारोती भिलवंडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष गंगाधर वडगावे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष इसाक अजीम, सुभाष पेरकेवार, गंगाधर गंगासागरे, मारोती सूर्यवंशी, शिवाजी सूर्यवंशी, देवीदास सूर्यवंशी, जमादार एस.एस. शिंदे, मिरदुडे, पंडित पवार, गणपत पवार, पी.आर. मुळे आदी उपस्थित होते.
सावित्रीबाईंना अभिवादन
नायगाव : तालुक्यातील पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गटशिक्षणाधिकारी लता कौठेकर, केंद्रप्रमुख मोहन कदम, सरपंच किरण कदम, अध्यक्षा गीता कदम, मुख्याध्यापक वीरभद्र मिरेवाड, वसंत शिंदे आदी उपस्थित होते.
हरिनाम सप्ताह
फुलवळ : येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला आहे. यानिमित्ताने दररोज काकडा आरती, भजन, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, प्रवचन, हरिपाठ, कीर्तन, जागर आदी कार्यक्रम होणार आहे. या सप्ताहात तुळशीराम जिरे महाराज, पंढरी मुरकुटे महाराज, अनंत बेटकर महाराज, काशीनाथ नगारवाडी महाराज, व्यंकट दगडवाडीकर महाराज, कृष्णा महाराज, बाबू महाराज, दीपक जोशी महाराज आदींची उपस्थिती राहणार आहे.
पोलिसांचा सन्मान
उमरी : पोलीस दल स्थापना निमित्ताने मानवाधिकार सामाजिक न्याय नागरिक मंचच्या वतीने पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष दादासाहेब श्रीरामवार, भाजपाचे गजानन श्रीरामवार, बालाजी माळवतकर, विवेक काचावार उपस्थित होते.
दोघांना पदोन्नती
नांदेड : ग्रामीण पोलीस स्टेशनमधील जमादार अशोक देशमुख व धोंडिबा मोरे यांना पदोन्नती मिळाली. पोलीस निरीक्षक प्रशांत देशपांडे व कर्मचाऱ्यांच्या वतीने दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सपोनि सुुरेश थोरात, डीबीचे शेख असद आदीही उपस्थित होते.